पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलमधील विन्हेडो येथे एक मोठे विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक टीव्ही ग्लोबोन्यूजने सांगितले की, शुक्रवारी (दि.9) ६२ जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. एटीआर-७२ विमान, एअरलाइन वोपस लिन्हास एरियास द्वारे संचालित, पराना राज्यातील कास्केव्हेल ते साओ पाउलो येथील ग्वारुलहोसकडे जात होते. साओ पाउलोच्या राज्य अग्निशमन दलाने सोशल मीडियावर पुष्टी केली की, विन्हेडोमध्ये एक विमान क्रॅश झाले आहे. अद्याप या दुर्घटनेमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
ब्राझिलियन टेलिव्हिजन नेटवर्क ग्लोबोन्यूजने घरांनी भरलेल्या निवासी भागात विमानाच्या बाजूने आग आणि धूर उडत असल्याचे फुटेज दाखवले. ग्लोबोन्यूजवरील अतिरिक्त फुटेजमध्ये एक विमान वेगाने खाली येताना दिसले. दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि उपस्थित लोकांना उभे राहून एक मिनिट मौन पाळण्यास सांगितले.
साओ पाउलोच्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमान क्रॅश झाले, त्यात ५८ प्रवासी आणि 4 क्रू सदस्य होते, एअरलाइनने एका निवेदनात पुष्टी केली. अपघात कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही.