स्पर्धा बनली जीवघेणी; एवढं खाल्ले की, त्याच ठिकाणी घेतला अखेरचा श्वास pudhari photo
आंतरराष्ट्रीय

स्पर्धा बनली जीवघेणी; एवढं खाल्ले की, त्याच ठिकाणी घेतला अखेरचा श्वास

पुढारी वृत्तसेवा

लंडन : अनेकांना खाण्याची आत्यंतिक आवड असते. त्यासाठी स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अशा स्पर्धांत जिंकण्यासाठी जीवाची पर्वा न करता स्पर्धक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा ते जीवघेणे ठरते. ब्रिटनमधील एका महिलेने स्पर्धा जिंकण्यासाठी इतके अन्न खाल्ले की, यात तिचा मृत्यू झाला आहे.

३७ वर्षीय नॅटली बुस एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. ही स्पर्धा जिंकणाऱ्यांना रोख रक्कम मिळणार होती. नॅटलीने तिच्या मुलाच्या १० वर्षांखालील रग्बी संघासाठी पैसे गोळा करण्याकरिता स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेदरम्यान, नॅटली स्टेजवर गुलाबी आणि पांढरे मार्शमॅलो खात होती. मात्र, स्टेजवरून उतरताच ती बेशुद्ध झाली. तिथे उपस्थित असलेल्या एका नर्सने तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर ते फोल ठरले. यानंतर तेथे उपस्थित सर्वजण हळहळले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT