आंतरराष्ट्रीय

९५ दशलक्ष पाकिस्तानी दारिद्र्यरेषेखाली!

दिनेश चोरगे

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : मागील आर्थिक वर्षात पाकिस्तानमधील दारिद्र्यात आणखी 39.4 टक्क्यांनी वाढ झाली असून, आणखी 12.5 दशलक्ष नागरिक या खाईत लोटले गेले आहेत. सध्याचे चित्र पाहता तेथील एकूण 95 दशलक्ष नागरिक दारिद्र्यरेषेखाली असून आर्थिक दिवाळखोरीतील या देशाने पुन्हा आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवणे आवश्यक आहे, असे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.

वॉशिंग्टनस्थित बँकेने पाकिस्तानमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्व संलग्न घटकांशी चर्चा केल्यानंतर हे निरीक्षण नोंदवले. मागील वर्षभरात पाकिस्तानमधील दारिद्र्यरेषा 34.2 टक्क्यांवरून 39.4 टक्क्यांवर पोहोचली. तेथील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची रोजची कमाई 3.65 अमेरिकन डॉलर्स इतकी नीचांकी पातळीवर असल्याचे बँकेने यात म्हटले आहे.

पाकिस्तानचे सध्याचे आर्थिक धोरण दारिद्र्य कमी करण्याच्या द़ृष्टीने अजिबात पूरक नाही. उलट त्यांची धोरणे देशाला आणखी डबघाईत घालणारी आहेत, असे वर्ल्ड बँकेचे पाकिस्तानमधील अर्थतज्ज्ञ तोबियास हक यांनी यावेळी नमूद केले. काटेकोर करवसुलीवर भर दिला आणि उधळपट्टी रोखली तरच या देशात आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT