video games pudhari
आंतरराष्ट्रीय

video games: व्हिडिओ गेम खेळणाऱ्या ९१ वर्षांच्या आजीबाईंनी पोलिसांनां चांगलंच पळवलं.... शेवटी अधिकाऱ्यांची जीव पडला भांड्यात

Anirudha Sankpal

91 year old woman playing video alert confirm ok system: क्लेव्हलँड सबर्बमध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सहा वाजता एक फोनवर रिंग वाजू लागली. रिंग एकदा झाली, दुसऱ्यांदा झाली. तिसऱ्यांदा झाली तर समोरून कोणी उत्तर देत नव्हतं. हा कॉल कोणत्या कॉल सेंटरचा किंवा उतावळ्या बॉयफ्रेंडचा नव्हतातर ओहिओमधील वेस्ट लेक येथील 'कन्फर्म ओके' सिस्टमचा होता.

ही कन्फर्म ओके सिस्टम ही जे नागरिक एकटेच राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्येक दिवशी त्यांची खुशाली जाणून घेण्याासठी तयार करण्यात आलेली ऑटोमेटेड सिस्टम आहे. ज्यावेळी वेस्टलेकमधी ९१ वर्षांच्या एकट्याच राहणाऱ्या आजीबांईंनी हा कन्फर्म ओके कॉल उचलला नाही तेव्हा संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. सकाळी ६.१० ला ही ऑटोमेटेड अलर्ट सिस्टम वेगानं कामाला लागली.

पोलिसांनी मुलीला केला कॉल

ज्यावेळी कन्फर्म ओके कॉलला उत्तर मिळालं नाही त्यावेळी ६ वाजून १२ मिनिटांनी पोलिसांनी तिच्या मुलीला कॉल केला. त्या मुलीनं माझी आई घरीच असयला हवी ती सहसा कुठं बाहेर जात नाही असं सांगितलं.

पोलिसांनी त्वरित त्या वृद्ध आजीबाईंचे घर गाठले. पोलीस अवघ्या सात मिनिटात तिथं पोहचले आणि त्यांनी दार ठोठावलं. तरी काही प्रत्युत्तर आलं नाही. घरात कोणती हालचाल देखील दिसली नाही. पोलिसांनी शेजारी पाजारी आजीबाईंबाबत चौकशी केली असताना शेजाऱ्यांनीही वेगळं असं काही घडत असल्याचं निदर्शनास आलेलं नाही असं सांगितलं.

गॅरेजमधून पोलीस पोहचले घरात

शेवटी पोलिसांनी मुलीकडून घराच्या गॅरेजच्या दरवाजाचा कोड मिळवला अन् घरात प्रवेश केला. आजीबाईंना पोलिसांनी हाक मारली तरी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. आता बॉडी कॅम सुरू असलेले पोलीस अन् तिकडं तिची मुलगी देखील टेन्शनमध्ये आले. पोलिसांनी त्वरित सावध पवित्रा घेत फ्लॅश लाईट ऑन केली. वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

सकाळच्या ६ वाजून २८ मिनिटे झाली होती. पोलिसांनी मॅम मॅम अशी हाक मारली. अखेर एका मिनिटांनी म्हणजे सहा वाजून २९ मिनिटांनी पोलिसांनी आपल्या आपल्या माईकमध्ये आम्ही आजीबाईंसोबत आहोत असा मॅसेज दिला. ज्या अधिकाऱ्यांनी आजीबाईंच्या घरात प्रवेश केला होता. त्यांनी सांगितलं की आजीबाई आपल्या बेडरूममध्ये व्हिडिओ गेम खेळत होत्या.

आजीबाई बसल्या होत्या बेडरूममध्ये

पहिली पाच सेकंद सगळीकडे शांतता होती. त्यानंतर डिस्पॅचरने कॉपी हा मेसेज दिला अन् तणावपूर्ण वातावरण निवळलं. त्या आजीबाई जिवंत होत्या. त्यांना त्या बेडरूमच्या बाहेर काय काय घडलं होतं याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्या तो पोलीस अधिकारी इथं काय करतोय हा भाव चेहऱ्यावर ठेवून होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आजीबाई त्यांच्या मोबाईलवर बबल पॉप हा गेम खेळत असाव्यात. नंतर वेस्टलेक पोलीस प्रवक्ते कॅप्टन गेराल्ड व्होगेल यांनी सांगितलं की, 'ज्यावेळी ही माहिती मी लोकांना देईन त्यावेळी सर्वांचा एकच प्रश्न असणार आहे की त्या कोणता गेम खेळत होत्या.' प्रवक्ते पुढे म्हणाले, की तो कोणता तरी बबल पॉप गेम होता. तो नेमका कोणता होता हे मला माहिती नाही.

पोलिसांनी या आजीबाईंचे नाव उघड केलेले नाही. मात्र या आजीबाईंनी पोलीस अधिकाऱ्याची अलार्म कॉलला उत्तर न दिल्याबद्दल माफी मागितली आहे. अशा प्रकारे ही केस क्लोज झाली. मात्र आता वेस्टलेक पोलिसांकडे त्या आजीबाईंसोबत मुलाखत देणार का याबाबत माध्यमांकडून विचारणा होत आहे. यात Jimmy Kimmel Live या सारख्या अनेक प्रसिद्ध मुलाखतकारांचा देखील समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT