सौदी अरेबियामध्ये रस्ते अपघातात ९ भारतीयांचा मृत्यू झाला. File Photo
आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियामध्ये रस्ते अपघातात १५ जणांचा मृत्यू; ९ भारतीयांचा समावेश

Saudi Arabia Road Accident : जिझान येथील घटना

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदी अरेबियामध्ये रस्ते अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नऊ भारतीयांचा समावेश माहिती समोर आली आहे. पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ बुधवारी (दि.२९) हा भीषण अपघात झाला. या अपघातात नेपाळ आणि घाना येथील प्रत्येकी तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. (Saudi Arabia Road Accident)

भारतीय समुदायाच्या मते, हे सर्व कामगार दक्षिणेकडील बंदर शहर जिझानमधील त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात होते. यादरम्यान त्यांची बस एका ट्रेलरला धडकली. बसमध्ये एकूण २६ जण होते, त्यापैकी १५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये तेलंगणातील जगत्याल जिल्ह्यातील मेटपाली मंडळातील रहिवासी कापेली रमेश (३२) ही भारतीय नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने रस्ते अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. स्थानिक अधिकारी आणि मृतांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. (Saudi Arabia Road Accident)

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले दु: ख

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला दुख झाल्याचे 'X' वर पोस्ट करत सांगितले. तसेच भारतीय वाणिज्य दूतावासाशी माझे बोलणे झाले असून ते संबंधित परिवारांच्या संपर्कात आहेत व ते त्यांना पूर्ण सहकार्य करतील, असेही ते म्हणाले. (Saudi Arabia Road Accident)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT