पुढारी ऑनलाईन डेस्क: जपानमधील दुर्गम इझू बेटाजवळ मंगळवारी (दि.२४ सप्टेंबर) ५.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू बेटाच्या दक्षिणेस सुमारे 180 किलोमीटर (111 मैल) अंतरावर होता, अशी माहिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) दिली. यानंतर जपानच्या हवामान संस्थेने (जेएमए) सुनामीचा इशारा जारी केला आहे.
जपान हवामान संस्थेने दिलेल्या त्सुनामी इशानुसार, मंगळवारी सकाळी ८. ३० ते ९ वाजेच्या दरम्यान जपानमधील इझू बेट आणि ओगासावारा बेटांवर १ ते ३ मीटर उंच लाटा उसळतील असेही हवामान विभागाने स्पष्ट केल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
जपान हे पॅसिफिक महासागरामधील रिंग ऑफ फायर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी साधारण १५०० भूकंपाचे धक्के या ठिकाणी जाणवतात. अनेक भूकंपाचे धक्के किरकोळ असले तरी बांधकाम तंत्रज्ञान आणि आपत्कालिक नियोजनामुळे जरी मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला तरी नुकसान कमी होण्यास यामुळे मदत होत आहे.