दुबई वृत्तसंस्था : जीवाची मुंबई करण्यासह जीवाची दुबई करणार्यांची संख्याही अलीकडे वाढली आहे. जगातील सर्वात उंच 'बुर्ज खलिफा' ही इमारत, 'बुर्ज अल-अरब'सारखे संग्रहालय त्याला कारणीभूत ठरले आहे. आता याच मालिकेत दुबईमध्ये एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येत असून, 'चंद्र' ही या रिसॉर्टची मध्यवर्ती कल्पना आहे.
- या रिसॉर्टवर 5 अब्ज अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 40 हजार कोटी रुपये) खर्च केले जाणार आहेत.
- रिसॉर्ट उभारणीचे काम कॅनडातील 'मून वर्ल्ड रिसॉर्टस् इंटरनॅशनल'कंपनीला देण्यात आले आहे. मुख्य इमारत 735 फूट उंच असेल.
- येत्या 4 वर्षांत ती बांधून होईल. मुख्य मार्ग गोलाकार असेल. दरवर्षी 25 लाख पर्यटक भेट देतील, अशी अपेक्षा आहे.
या अद्ययावत सुविधा
- स्पा सेंटर, नाईट लाईफसाठी विशेष सेक्शन्स
- सर्वात वरच्या मजल्यावरील कसिनो, नाईट क्लब्स
- गच्चीचा एक तृतीयांश भाग हा बीच क्लबसाठी
- लगूनसह रिसॉर्टमध्ये अॅम्पी थिएटरचीही सुविधा
दुबईतील पर्यटनाला गेल्या काही वर्षांत बहर आलेला आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीत पर्यटनातील उलाढालीने 19 अब्ज दिर्हमचा (5.2 अब्ज अमेरिकन डॉलर) टप्पा ओलांडला आहे.
– शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, प्रमुख, दुबई
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.