आंतरराष्ट्रीय

तिघा टिकटॉक स्टारसह कराचीत ४ जणांचा खून

Pudhari News

कराची : वृत्तसंस्था

कराचीत मंगळवारी झालेल्या हत्याकांडात टिकटॉक स्टार मुस्कान शेख, तिचा जोडीदार आमिर याच्यासह अन्य 2 युवकांचा मृत्यू झाला आहे. हे चौघे जण एका कारमधून जात होते. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. चौघांपैकी तिघे जण आपल्या व्हिडीओंमुळे पाकिस्तानात ओळखले जात असत. हल्लेखोरांनी गाडी अडवून अगदी जवळून गोळ्या झाडल्या. शहरातील एका मोठ्या रुग्णालयासमोरच हे हत्याकांड घडले. 

मुस्कान शेख ही जागीच मरण पावली; तर आमीर, सद्दाम हसन आणि रेहान यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याअगोदर फैसलाबादमध्येही टिकटॉक स्टार युवकाच्या खुनाची घटना घडली होती. पाकिस्तान सरकारने अश्‍लीलतेचा आरोप करून टिकटॉकवर बंदी घातली होती. नंतर चीनच्या दबावाखाली नऊच दिवसांत बंदी हटविलीही होती. टिकटॉकमुळे अश्‍लीलतेचा प्रचार होत असल्याचे पाकिस्तानातील अनेक सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT