WWII bombs Cologne Germany x
आंतरराष्ट्रीय

WWII bombs Cologne Germany | जर्मनीतील कोलोनमध्ये सापडले दुसऱ्या महायुद्धातील 3 प्रचंड बॉम्ब; 20000 नागरिकांचे स्थलांतर, शहर केले रिकामे

WWII bombs Cologne Germany | 20 टनाचे दोन तर 10 टनाचा एक बॉम्ब; दुसऱ्या महायुद्धाच्या 70 वर्षांनंतर जर्मनीतील शहरावर भीतीची छाया

Akshay Nirmale

WWII bombs Germany Cologne bomb defusal evacuation

कोलोन (जर्मनी) : हॉलीवूडमधील एखाद्या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाला लाजवेल अशी घटना नुकतीच जर्मनीतील कोलोन या शहरात घडली आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी हा एक प्रमुख देश होता. त्यामुळे तिथे अजुनही दुसऱ्या महायुद्धातील अधुनमधून बॉम्ब सापडण्याच्या घटना घडत असतात.

पण, नुकतेच कोलोन शहरात चक्क तीन प्रचंड मोठे अमेरिकन बॉम्ब सापडल्याने मोठी खळबळ माजली. या धोकादायक तिन्ही बॉम्बचे मिळून एकत्रित वजन 50 टनांहून अधिक होते.

त्यामुळे हे बॉम्ब निष्क्रिय (defuse) करण्यासाठी मोहिम सुरू करण्यापुर्वी स्थानिक प्रशासनाने चक्क शहर रिकामे करण्याचा निर्णय घेतला आणि 20,000 हून अधिक लोकांना शहराबाहेर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

या स्थलांतरामुळे ही अलीकडील काळातील सर्वात मोठी आपत्कालीन मोहिम ठरली आहे.

50 टन वजनाचे बॉम्ब

2 जून रोजी हे बॉम्ब्स कोलोनच्या मध्यवर्ती भागातील कोलोन-डॉएट्झ (Cologne-Deutz) येथील डॉएट्झर व्हेर्फ्ट (Deutzer Werft) परिसरात एका शिपयार्डमध्ये सापडले.

तीनपैकी दोन बॉम्ब 20 टन वजनाचे आणि एक 10 टन वजनाचा अमेरीकन बॉम्ब होता, ज्यामध्ये impact fuzes होते – म्हणजेच हे बॉम्ब पडताक्षणी फुटू शकले असते.

त्यामुळे तातडीने एक किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या क्षेत्रात कोलोनच्या ऐतिहासिक ओल्ड टाऊन भागाचा तसेच डॉएट्झ (Deutz) परिसराचाही समावेश होता.

स्थलांतर मोहिमेत एका व्यक्तीचा अडथळा

जर्मन टेलिव्हिजन DW ने दिलेल्या माहितीनुसार, एक रहिवासी आपल्या घरातून बाहेर पडण्यास नकार देत असल्यामुळे बॉम्ब निकामी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला उशीर झाला.

“आम्ही ही मोहिम तेव्हाच सुरू करू शकतो, जेव्हा शेवटचा नागरिकही सुरक्षितरित्या या क्षेत्राच्या बाहेर गेलेला असेल,” असे ड्युसलडॉर्फमधील बॉम्ब निकामी पथकाचे प्रमुख काई कुल्शेव्स्की यांनी सांगितले होते.

प्रशासनाची कठोर भूमिका

दरम्यान, कोणतीही व्यक्ती जर स्थलांतरास नकार देत असेल, तर पोलिस आणि प्रशासन सक्तीने बाहेर काढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. “जर तुम्ही सहकार्य केलं नाही, तर आम्ही पोलिसांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढू," असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

भव्य आणि जटिल स्थलांतर मोहीम

या बॉम्बच्या धोक्यामुळे शहर प्रशासनाने 20000 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर सुरू केले. या भागात एडुआर्डस हॉस्पिटल (Eduardus Hospital), वृद्धाश्रम, शाळा, बालकेन्द्रे, चर्च, व्यवसायिक आस्थापने आणि रेल्वे सेवा यांचा समावेश होता. या सर्व गोष्टी तातडीने बंद करण्यात आल्या.

कोलोन शहर प्रशासनाने सांगितले की, “संपूर्ण शहरात 262 वेळा हवाई हल्ले झाले होते. 1940 साली केवळ एका हल्ल्यानंतर 770000 पैकी सुमारे 25 टक्के लोकांनी शहर सोडले होते. युद्ध संपेपर्यंत फक्त 20000 रहिवासी शहरात शिल्लक राहिले होते.”

शहराच्या संयमाचे आणि प्रशासनाच्या तयारीचे कौतुक

या अतिविशाल आणि जोखमीच्या मोहिमेमुळे संपूर्ण शहरात एकप्रकारचे युद्धजन्य वातावरण निर्माण झाले होते. दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा आणि सरकारी कार्यालयं संपूर्ण दिवसभर बंद होती. पण प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे आणि संयमाने ही प्रक्रिया पार पाडली.

सावधगिरीने बॉम्ब केला निष्क्रिय

या आपत्कालीन मोहिमेमुळे संपूर्ण शहरात वाहतूक, पर्यटन आणि नागरी सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. 58 हॉटेल्स, 9 शाळा, अनेक सरकारी कार्यालये, संग्रहालये आणि कोलोनचे प्रसिद्ध फिलहार्मोनिक हॉल तत्काळ बंद करण्यात आले. त्यासोबतच रेल्वे व रस्ते वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली.

बॉम्ब निकामी करणाऱ्या Rhineland Explosive Ordnance Disposal Service च्या तज्ज्ञांनी 4 जून रोजी संध्याकाळी 7.19 वाजता हे तीन बॉम्ब निष्क्रिय केल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. त्यानंतर रस्ते, पूल आणि इतर सुविधा हळूहळू पुन्हा सुरु करण्यात येत आहेत.

जर्मनीमध्ये अशी प्रकरणे वारंवार

जर्मनीत दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक वेळा बॉम्ब्स आढळले आहेत. बांधकाम किंवा उत्खननाच्या कामात अनेकदा असे बॉम्ब्स सापडतात. मात्र यावेळी बॉम्ब्सचा आकार, वजन, क्षमता आणि बॉम्ब सापडलेली घनदाट वस्तीमुळे ही घटना अधिक गंभीर ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT