Shot Outside A Nightclub
अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील एका नाईट क्लबजवळ माथेफिरुने केलेल्‍या गोळीबारात तीन जण ठार झाले.  File Photo
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत अंदाधूंद गोळीबार; ३ ठार, १६ गंभीर

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील एका नाईट क्लबजवळ माथेफिरुने केलेल्‍या गोळीबारात तीन जण ठार तर १६ जण जखमी झाल्याचे वृत्त स्‍थानिक 'बीएनओ न्यूज'ने दिले आहे.

नाईटक्लबच्या परिसरात एकाने अंदाधूंद गोळीबार केला. यामध्‍ये नाईट क्लबच्या बाहेर उभे असणार्‍या तिघांचा मृत्‍यू झाला तर १६ जण गंभीर जखमी आहेत, अशी माहिती इंडियनोलाचे पोलिस प्रमुख रोनाल्ड सॅम्पसन यांनी माध्यमांना सांगितले.

मिसिसिपीचे महापौर केन फेदरस्टोन यांनी या हल्‍ल्‍याबाबत माहिती देताना सांगितले की, हल्‍ला का झाला, याबाबत पोलिसांना अद्‍याप माहिती मिळालेले नाही. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

SCROLL FOR NEXT