Bangkok Pub Fire | बँकॉकमध्ये पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

Bangkok Pub Fire | बँकॉकमध्ये पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

२२ गंभीर : धुरामुळे अनेकजण गुदमरले

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधील उत्तर भागातील ना लाडफ्राओ या पबमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागून किमान २७ जणांचा मृत्यू झाला, तर ६३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अग्निशमन दलाने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

बँकॉकचे राज्यपाल चाडचार्ट सित्तीपुंत यांनी सांगितले की, आग अत्यंत वेगाने छतापर्यंत पसरली. दाट धुरामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन मार्गाजवळ अनेक मृतदेह आढळले असून, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग अडथळ्यांमुळे बंद झाला असावा, अशी शक्यता तपासली जात आहे.

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, मंचाजवळील विद्युत सर्किट ब्रेकरमधून धूर येत असल्याचे एका संगीतकाराने पाहिले होते. त्यानंतर वीज खंडित झाली, स्फोटाचा आवाज झाला आणि काही क्षणांत संपूर्ण पब दाट धुराने भरून गेला. आगीनंतरचे व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये पबचा आतील भाग पूर्णपणे जळाल्याचे दिसून आले. अनेक जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT