आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोटात 24 सैनिक ठार

Arun Patil

मियानवली, वृत्तसंस्था : पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला असून, यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलिस स्टेशनला धडक दिली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

दहशतवाद्यांनी उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील एका पोलिस स्टेशनला स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक मारली. धडकेनंतर स्फोटकांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हा हल्ला पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्वामधल्या अफगाणिस्तान सीमेजवळच्या डेरा इस्माईल खान भागात झाला, असे सांगण्यात आले.

पाकिस्तान लष्कराकडून या पोलिस स्थानकाचा वापर बेस कॅम्प म्हणून केला जात होता. स्फोटात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक थेट पोलिस स्टेशन इमारतीत घुसवला. त्यानंतर काही दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तिबानी ग्रुप तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्लाची जबाबदारी घेतली आहे.

SCROLL FOR NEXT