Iran Israel US conflict (Pudhari File Photo)
आंतरराष्ट्रीय

US Israel Iran war: इराण हल्ल्यात अमेरिकेचे 200 सैनिक जखमी

अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत किमान 200 अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धात आतापर्यंत किमान 200 अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’च्या सुरुवातीपासून ही हानी झाली असून बहुतेक जखमा किरकोळ असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापैकी सुमारे 180 सैनिक पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

किमान 10 सैनिक गंभीर जखमी झाल्याचेही समोर आले आहे. काही सैनिकांना भाजणे, स्फोटातील तुकड्यांमुळे (श्रॅप्नेल) जखमा तसेच मेंदूवरील आघात (ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी) झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमांचे नेमके कारण किंवा तपशील मात्र अधिकृतरीत्या उघड करण्यात आलेले नाहीत.

13 सैनिकांचा मृत्यू

या संघर्षात आतापर्यंत 13 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम इराकमध्ये लष्करी इंधन भरणारे विमान कोसळल्याने सहाजण ठार झाले. कुवेतमधील नागरी बंदरावरील ऑपरेशन सेंटरवर इराणी ड्रोन हल्ल्यात सहा सैनिकांचा मृत्यू झाला, तर सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेसवरील हल्ल्यात जखमी झालेल्या एका सैनिकाचा नंतर मृत्यू झाला.

ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत विरोधाभासी भूमिका घेतली आहे. एका बाजूला त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी सहयोगी देशांनी पुढे यावे, असे आवाहन केले, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेकडे स्वतःचे भरपूर तेलसाठे असल्याने लष्करी हस्तक्षेप टाळण्याचेही संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT