आंतरराष्ट्रीय

20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका

Shambhuraj Pachindre

कराची वृत्तसंस्था : पाकिस्तानने रविवारी 20 भारतीय मच्छीमारांची सुटका केली. हे सर्व कराचीतील लांधी भागातील मलिर जिल्हा कारागृहात गेल्या पाच वर्षांपासून कैदेत होते. या सर्वांवर पाकिस्तानच्या समुद्री सीमेत अवैधरित्या मासेमारी करताना पकडण्यात आल्याचा आरोप आहे. लाहोरमध्ये वाघा बॉर्डर सीमेवरून या सर्वांना भारतात पाठवले जाणार आहे.

तुरुंगाधिकारी मुहम्मद इरशाद यांनी सांगितले की, या मच्छीमारांची सुटका करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यांना ईडी ट्रस्टकडे सोपवले जाईल. ते पोलिस सुरक्षेसह त्यांना लाहोरला घेऊन जातील. जून 2018 मध्ये पाकिस्तानी तटरक्षक दलाने त्यांना अटक केली होती. पाकिस्तानाच्या ईदी वेल्फेयर फाऊंडेशनचे प्रमुख फैजल ईदी म्हणाले की, भारतीय मच्छीमारांच्या सर्व खर्चाचा आणि प्रवासाची सोय केली जात आहे.

पाच वर्षांपासून कराची तुरुंगात होते बंद

अद्यापही 568 भारतीय मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात

पाकिस्तानने पाच महिन्यांपूर्वीदेखील 20 भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. त्यांना वाघा बॉर्डरवरून भारतात पाठवले होते. तथापि, पाकिस्तानातील विविध तुरुंगात अद्यापही 568 मच्छीमार कैदेत आहेत. यातील सर्वाधिक कराचीतील लांधी कारागृहात आहेत. तर भारतीय तुरुंगांमध्येही पाकिस्तानचे जवळपास 620 मच्छीमार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT