Los Angeles
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील ईस्ट हॉलिवूडमध्ये शनिवारी एक वाहन लोकांच्या गर्दीत घुसल्याने किमान २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने ही माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे. ही घटना सांता मोनिका बुलेव्हार्ड येथे घडली.
स्थानिक वेळेनुसार ही घटना पहाटे २ वाजता घडली. एक अज्ञात वाहन अचानक लोकांच्या गर्दीत घुसले. यामुळे गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते संगीत स्थळाच्या परिसरात आहे. घटनास्थळावरील काही छायाचित्रे समोर आली असून त्यात फुटपाथवर एक राखाडी रंगाची कार दिसते. तर रस्त्यावर वाहनाचे तुटलेले अवशेषही दिसून आले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.