International College of Music 
Latest

International College of Music: लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

मोनिका क्षीरसागर

मुंबई,पुढारी वृत्तसेवा: भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमीपूजन झाले. ऑनलाईन भूमीपूजनाचा कार्यक्रम आज बुधवार (दि.१३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर व अधिकारी उपस्थित होते. (International College of Music)

संगीतात नवे शिकू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी मिळणार

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय देशात असावे; या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल. (International College of Music)

'असे' असणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय

सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ.मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार असून, याठिकाणी चारशे आसनव्यवस्थेचे सभागृह, 18 क्लासरुम्स, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, 200 विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, 300 आसनी खुले सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत. (International College of Music)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT