Latest

Instagram देणार ट्विटरला टक्कर!, लवकरच लाँच करणार ‘टेक्स्ट’ ॲप!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Instagram आता ट्विटरशी स्पर्धा करण्‍यासाठी सज्‍ज झाले आहे. लवकरच Instagram 'टेक्स्ट' (मजकूर आधारित) ॲप लाँच करणार आहे, असे वृत्त 'ब्लूमबर्ग न्यूज'ने दिले आहे. नवीन ॲप संदर्भात चाचणी आता अंतिम टप्‍प्‍यात आल्‍याचेही
या वृत्तात नमूद करण्‍यात आले आहे. (Instagram Text-Based App)

मेटा प्लॅटफॉर्म्सचे इंस्टाग्राम सध्या सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती नवीन ॲपच्‍या वापरकर्ते होण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत. इंस्टाग्राम काही महिन्यांपासून निवडक निर्मात्यांशी चर्चा करत आहे. तसेच मूळ कंपनी मेटाने नवीन ॲप निवडक निर्मात्यांना काही महिन्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे इंस्टाग्रामपासून वेगळे असल्याचे म्हटले जाते आहे.

'ब्लूमबर्ग न्यूज'ने दिलेल्‍या माहितीनुसार, इंस्टाग्रामच्‍या टेक्‍स्‍ट ॲपचा प्राथमिक अवस्‍थेतील स्क्रीनशॉट प्रकाशित करणार्‍या लिया हेबरमन यांच्या मतानुसार, हे ॲप इंस्टाग्रामपेक्षा वेगळा असेल; परंतु लोकांना खाती कनेक्ट करण्याची परवानगी देईल. कंपनी जूनमध्‍ये हे ॲप लाँच करण्‍याची शक्‍यता आहे. मॅस्टोडॉनसह इतर Twitter स्पर्धक कंपनीसारखेच हे  ॲप्स सुसंगत असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त होत आहे. मात्र Instagram ने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Instagram Text-Based App : असे असेल इंस्टाग्रामचे नवीन 'टेक्स्ट' ॲप!

लिया हेबरमन यांच्या स्क्रीनशॉटनुसार,  इंस्टाग्रामच्‍या टेक्‍स्‍ट ॲप हे वापरकर्त्यांना  त्यांच्या मित्रांशी मजकूर, शेअर केलेले लिंक, फोटो तसेच व्हिडिओ वापरून कनेक्ट करण्याची सुविधा देते. तसेच  फक्त एका टॅपने इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या प्रभावशाली आणि निर्मात्यांच्या खात्यांमध्ये सामील होण्याचीही परवानगी देते.

सुरक्षा उपायांसाठी हे  ॲप अपडेट केले जात आहे. खात्यांची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी, Instagram वरील वापरकर्त्यांना लवकरच नवीन ॲपची सुविधा दिली जाईल, असे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT