कोलकाता; पुढारी ऑनलाईन :
टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी २० सामना ८ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घतली आहे. टीम इंडियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजचा संघ ३ बाद १७८ धावा करू शकला. टीम इंडियाचा हा सलग ८ वा टी २० सामन्यातील विजय आहे. विंडिजकडून निकोलस पुरन आणि पॉवेलने अनुक्रमे सर्वाधिक ६२ आणि ६८ धावा केल्या. तर भारताच्या रवी बिष्णोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयासह टीम इंडियाने टी२० मालिकाही जिंकली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग चौथी टी-२० मालिका जिंकली.
तत्पूर्वी, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 बाद 186 धावांचे आव्हान उभे केले. कोहलीने 41 चेंडूत 52 तर पंतने 28 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. दोघांनीही आपल्या अर्धशतकी खेळीत सात चौकार आणि प्रत्येकी एक षटकार ठोकला. पंतने व्यंकटेश अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अय्यरने अक्रमक खेळी करत चार चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने 18 चेंडूत 33 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने 25 धावांत तीन बळी घेतले.
187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या पाच षटकांत संघाने 34 धावा केल्या. सहाव्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. काइल मेयर्सला 9 धावांवर युझवेंद्र चहलने बाद केले. दुसरा धक्का नवव्या षटकात बसला. रवी बिश्नोईने ब्रेंडन किंगला 22 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या विकेटसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी 60 चेंडूत 100 धावा जोडल्या. ही भागीदारी भुवनेश्वर कुमारने पूरनला (62) बाद करून फोडली.
भुवनेश्वर कुमारने अखेर विंडीजची महत्त्वपूर्ण भागीदारी मोडली. त्याने ६२ धावांवर निकोलस पूरनला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले. यावेळी बिष्णोईने कोणतीही चूक केली नाही आणि मागे धावत एक अप्रतिम झेल घेतला. ही विकेट भारताला योग्य वेळी मिळाली.
दिपल चहरच्या (१६.५ वे षटक) षटकार ठोकून निकोलस पुरने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर पुढच्याच षटकात पॉवेलने हर्षल पटेलच्या (१७.२ वे षटक) चेंडूवर एक धाव काढून ५० धावा पूर्ण केल्या. दीपक चहर त्याच्या चौथ्या षटकात खूप महाग पडला आणि त्याने १६ धावा दिल्या. निकोलस पूरननेही ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल ही जोडी भारतासाठी आव्हानात्मक बनत चालली आहे. दोन्ही खेळाडूंनी मिळून 33 चेंडूत 54 धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजने १२ आणि १३ व्या षटकात २४ धावा वसूल केल्या. याचबरोबर विंडिजने १०० धावा पूर्ण केल्या.
युझवेंद्र चहलने फेकलेले १० वे षटक मनोरंजक ठरले. पहिल्या चेंडूवर सिमारेषेनजीक निकोलस पुरना झेल सुटला. त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर तिस-या चेंडूवर पुरनने उत्तुंग षटकार ठोकला. तर पाचव्या चेंडूवर पॉवेलने चौकार लगावला. या षटकात विंडिजने १३ धावा वसूल केल्या. त्यानंतर १२ वे षटक फेकत असलेल्या चहला पुरनने पहिल्या चेंडूवर चौकार आणि पॉवेलने पाचव्या चेंडूवर षटकार मारून या षटकात १२ धावा वसूल केल्या. चहलने चार षटक ३१ धावा दिल्या आणि एक बळी घेतला.
५९ धावसंख्येवर विंडिजला दुसरा झटका ब्रँडन किंगच्या रुपात बसला. त्याचा अडसर रवी बिष्णोईने दूर केला. किंगने दोन चौकांच्या सहय्याने ३० चेंडूत २२ धावा केल्या.
१८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या पाच षटकांत संघाने 34 धावा केल्या. सहाव्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. काइल मेयर्सला युझवेंद्र चहलने बाद केले. चहलने मेयर्सला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. मेयर्सला १० चेंडूत नऊ धावा करता आल्या.
तत्पूर्वी, पंतने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 18 चेंडूत 33 धावांची आक्रमक खेळी खेळली. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 76 धावांची भागीदारी झाली. त्याचवेळी विराट कोहली 41 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. विराटच्या कारकिर्दीतील हे 30 वे अर्धशतक होते.
याशिवाय कर्णधार रोहित शर्मा 18 चेंडूत 19 धावा, इशान किशन 10 चेंडूत दोन धावा आणि सूर्यकुमार यादवने सहा चेंडूत आठ धावा केल्या. एका चेंडूवर एक धाव घेत हर्षल पटेल नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने चार षटकांत 25 धावा देत तीन बळी घेतले. त्याचवेळी शेल्डन कॉट्रेल आणि रोमॅरियो शेफर्ड यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पंधराव्या षटकात ऋषभ पंतने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. त्याने पोलार्डच्या षटकातील पहिल्या, पाचव्या सहाव्या चेंडूवर चौकार लगावले. त्यानंतर कॉट्रेलच्या पुढच्या षटकात अय्यरने तिस-या, चौथ्या चेंडूवर आणि पंतने शेवटच्या सहाव्या चेंडूवर चौकार ठोकले. त्यानंतर होल्डरच्या १६.५ व्या षटकारत अय्यरने उत्तुंग षटकार लगावला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली.
भारतीय डावाच्या १४ व्या षटकात विराट कोहली बाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. विराटने ३९ चेंडूंमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक झळकावले. रोस्टन चेसच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर चौथ्या चेंडूवर रोस्टन चेसने त्याला क्लीन बोल्ड केले. चेसचा तिसरा बळी ठरला. यापूर्वी त्याने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. चेसने चार षटकांत केवळ २५ धावा दिल्या.
मागच्या T20 मध्ये भारताला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव दुसऱ्या T20 मध्ये फार काही करू शकला नाही. रोस्टन चेसने त्याला बाद केले. सूर्यकुमारला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. सलग दुसऱ्या सामन्यात चेसने विंडीजसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या टी-20 मध्येही त्याने दोन विकेट्स घेतल्या होत्या.
फिरकीपटू रोस्टन चेसने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील भागीदारी तोडली. त्याने रोहितला ब्रँडन किंगकरवी झेलबाद केले. रोहितला १८ चेंडूत १९ धावा करता आल्या. त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या २ बाद ५९ होती.
इशान किशन बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी विराट कोहली मैदानात उतरला. त्याने आक्रमक खेळ करत संघाचा धावफलक हलता ठेवला. त्याने कॉट्रेलच्या षटकाच्या (सहावे) दुस-या आणि तिस-या चेंडूवर चौकार लगावले. याचबरोबर भारताने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार खेचला.
या सामन्यात इशान किशन फ्लॉप ठरला. तो काही फारसे करू शकला नाही. अवघ्या दोन धावा करून इशान दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. दुस-या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शेल्डन कॉट्रेलने त्याला मेयर्स करवी झेलबाद केले. कॉट्रेलने हे षटक निर्धाव टाकले. यावेळी संघाची धावसंख्या १० होती.
टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. विंडीजने एक बदल केला असून फॅबियन ॲलनच्या जागी जेसन होल्डरला संघात स्थान देण्यात आले आहे.
विंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डचा हा १०० वा टी २० आंतरराष्ट्रीय सामना आहे. पोलार्ड १०० टी २० सामने खेळणारा जगातील ९ वा आणि विंडिजचा पहिला खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, (विकेटकीपर), व्यकटेश अय्यर, दिपक चाहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोई
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर, शेल्डन कॉट्रेल.
भारतीय संघाने सलग ७ टी-२० सामने जिंकले आहेत. आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या सामन्यात विजय मिळवला तर हा सलग ८ वा विजय असेल. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या (१२) नावावर आहे. अफगाण संघाशिवाय सहयोगी संघ रोमानियानेही सलग १२ सामने जिंकले आहेत. तिस-या क्रमांकावर पुन्हा अफगाणिस्तानचेच (११) नाव येते. तर चौथ्या क्रमांकावर युगांडाने सलग ११ टी-२० सामने जिंकले आहेत. २००९ मध्ये पाकिस्तानने सलग ७ टी-२० सामने जिंकले होते.
या दौऱ्यात वेस्ट इंडिजने आतापर्यंत चार सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकदिवसीय मालिकेतही संघाला टीम इंडियाकडून क्लिन स्विप मिळाला. विंडिज संघाच्या गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट्स घेतल्या, पण फलंदाजांना आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. विंडीजला मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर आज दुसऱ्या टी २० सामन्यात खेळाच्या प्रत्येक पातळीवर दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल.