पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रिंगरोडसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यावर अन्याय केला जात असून, बाजार मूल्याच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, बागायती व हंगामी बागायत मान्य करा असा विविध मागण्यांसाठी रिंग रोड शेतकरी हक्क समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जात आहे. हवेली तालुक्यातील कल्याण, रांजे, राठवडे, वरदाडे, वसावे वाडी, सांगरून, मांडवी, तातवडी, बाहुली यासह अन्य गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
"आमचा विकासाला विरोध नाही, पण ज्यावेळी प्राथमिक नोटीस बजावली त्यात बागायत आणि हंगामी बागायत अशी नोंद होती, परंतु अंतिम नोटीस पाठवण्यात आली. त्यात खरीप हंगाम म्हणुन पाठवली आहे, यामुळे मोबदला कमी मिळणार आहे, शासन निर्णयानुसार पाचपट मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.