Latest

इन्फ्लुएन्झाचे रुग्ण ११९ वर; मुंबई अलर्टवरच

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत एच३एन२ इन्फ्लुएन्झाचे रुग्ण ११९ वर पोहोचले असून, एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लूचे रुग्ण ३२४ झाले आहेत. ही साथ रोखण्यात कर्मचारी संप आडवा येत असेल तर तातडीने कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईत रुग्णाचा ताप चोवीस तासांत उतरला नाही तर त्यास चाचणी अहवालाची वाट न बघता सरळ ओसेल्टामिवीर गोळ्या सुरू करण्याचा सल्ला महापालिकेने खासगी डॉक्टरांना दिला आहे. याशिवाय अतिधोका असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचे निर्देशही दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT