पुढारी ऑनलाईन: अनेक कारणांमुळे एअरलाइन्स सध्याच्या घडीला 'हॉट' विषय बनला आहे. पी-गेटच्या घटनेपासून ते हाणामारीपर्यंत तर कधी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणात दगड सापडणे, केबिन क्रूशी गैरवर्तन करण्यापर्यंत असे बरेच काही घडले आहे. त्यानंतरही फ्लाइट्सने कधीही जास्त वादंग निर्माण केले नाहीत. अनेक सामान्य घटना घडल्या, ज्यामुळे लोकांनी विमान कंपन्यांच्या प्रवासाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आताही ही एका घटनेत इंडिगो एअरलाइन्स लोकप्रिय भारतीय ब्रेकफास्ट पोह्याचा उल्लेख ताजे सलाड म्हणून केल्याने ट्विटरवर ट्रेंड करत आहे. त्यांना त्यांच्या या चुकीबद्दल नेटिझन्सकडून जोरदार ट्रोल केले जात आहे.
28 जानेवारी रोजी एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फ्लाईटमध्ये सर्व्ह केलेल्या ताज्या सॅलड्सबद्दल एक पोस्ट शेअर केली. मात्र, पोस्टमधील फोटोमध्ये पोह्यांची प्लेट दिसत होती. त्यात कोणीतरी वरून लिंबू पिळतानाही दाखवले होते. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "सॅलड्स जे एकाच दिवशी तयार केले जातात आणि सर्व्हही केले जातात, ते एकदा ट्राय करून पहा, नंतर तुम्ही बाकी सर्व तुम्ही विसरून जाल."
या पोस्टने लगेचच इंटरनेटवर लक्ष वेधले. त्यावर प्रतिक्रिया देत नेटिझन्सने कमेंट बॉक्समध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. एका वापरकर्त्याने लिहिले की, "तुम्ही जर भारतीयांशी बोलत असाल, तर हे कोशिंबीर नाही- ते "पोहे" आहेत. तुम्ही आतापर्यंत 'रेडी टू इट' उपमा / पोहे विकत होतात; कदाचित हे व्हर्जन लिंबाचा रस टाकलेले ताजे पोहे आहेत. हे सॅलड नाही. कृपया इंडिगोने गोष्टी बरोबर सांगाव्यात."
दुसर्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, "इंडिगो"ने पोह्यांसाठी सॅलड्सची खरेदी करताना एक स्वादिष्ट चूक केली आहे असे दिसते! बॉन एपेटिट."
तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "आम्ही मुंबईत रोज सकाळी एवढी कोशिंबीर खायचो हे कधीच कळले नाही."
भारतीय ब्रेकफास्टसाठी प्रसिद्ध असलेल्या पोह्यांना सॅलड म्हटल्यामुळे इंडिगो एअरलाइनला ट्रोल केले गेले आहे. इतके की #पोहा देखील ऑनलाइन ट्रेंड करू लागला.