पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. भारताच्या तीन फलंदाज अवघ्या 40 धावांत बाद झाले. यामध्ये शुभमन गिल 9, विराट कोहली 0 आणि श्रेयस अय्यर 4 धावांवर बाद झाले. रोहित 87, केएल राहूल 39 आणि अखेरीस सुर्यकुमारने केलेल्या 49 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 229 धावा केल्या. (IND vs ENG WC Match)
सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 50 षटकांत नऊ विकेट गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 87 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 49 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 40 धावांत तीन विकेट गमावल्या. शुभमन गिल 9,विराट कोहली 0 आणि श्रेयस अय्यर 4 धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. तर श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला.
एकाबाजून विकेट पडत असताना रोहितने आणि केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. राहुल ५८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने वनडे कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 66 चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. शतकापासून 13 धावा दूर असातान आदिल रशीदच्या चेंडूवर रोहित लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद झाला. त्याने 101 चेंडूत 87 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले.
रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला. शेवटी सूर्याने काही चांगले फटके मारले आणि भारताची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. तो 47 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. शमी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला 25 चेंडूत 16 धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मार्क वुडला एक विकेट मिळाली. (IND vs ENG WC Match)
हेही वाचा :