Latest

Expensive Flat : २५२ कोटींचा देशातील सर्वांत महागडा फ्लॅट! जाणून घ्या मुंबईतील चर्चेतील व्यवहार

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बजाज ग्रुपचे नीरज बजाज यांनी देशातील सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर भागात लोढा मलबार पॅलेसमधील निवासी रिअल इस्टेटमधील पेंटहाऊस फ्लॅट तब्बल २५२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. देशातील हा सर्वात महागडा फ्लॅट ठरला आहे. यापूर्वी वेलस्पन ग्रुपचे बीके गोयंका यांनी मुंबईतच २४० कोटी रुपयांना पेंटहाऊस खरेदी केले होते. बजाज आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्समध्ये १८ हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅटचा करार झाला आहे.

यापूर्वी, वेलस्पन ग्रुपचे बी.के. गोयंका यांनी वरळी येथे २४० कोटी रुपयांना खरेदी केलेले पेंटहाऊस चर्चेचा विषय बनले. मात्र, बजाज यांच्या खरेदीने आधीचे खरेदी विक्रम मोडीत काढले.

इंडेक्सटॅप डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांवरून मुंबईतील या मोठ्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे. हा करार १३ मार्च २०२३ रोजी झाला आहे. कागदपत्रांनुसार, खरेदी केलेल्या तीन अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ १८ हजार चौरस फूट (चटई क्षेत्र १२६२४ चौरस फूट) आहे. यासोबतच ८ पार्किंग स्लॉटही दिले आहेत. बजाज समूहाचे प्रवर्तक नीरज बजाज हे आशियातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. नीरज हे बजाज समूहाच्या अंतर्गत स्टेनलेस स्टील उत्पादन कंपनी मुकंद लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार नीरज बजाज यांची एकूण संपत्ती ६५ हजार कोटी रुपये आहे.

नीरज बजाज हे व्यवसायाबरोबरच प्रसिद्ध टेबलटेनिसपटूही आहेत. चार वेळा त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली असून सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. टेबलटेनिसमधी योगदानासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. दरम्यान, या महागड्या घराच्या खरेदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळते.

स्टॅम्प ड्युटी १५.१५ कोटी

फ्लॅटच्या करारासाठी स्टॅम्प ड्युटी १५.१५ कोटी रुपये भरल्याचे कागदपत्रांमध्ये दिसते. या प्रकल्पाचे नाव लोढा मलबार पॅलेस असून त्यात ३१ मजले आहेत. या प्रकल्पात किमान ९,००० चौरस फूटाचे फ्लॅट आहेत. त्याच्या प्रत्येक अपार्टमेंटची किंमत १०० कोटींपेक्षा जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT