Latest

Amarnath Ghosh | प्रसिद्ध भरतनाट्यम डान्सर अमरनाथ घोष याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत भारतीयाच्या निर्घृण हत्येचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका घटनेत कोलकात्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम आणि कुचुपुडी डान्सर अमरनाथ घोष (Indian Bharatnatyam dancer Amarnath Ghosh) याची अमेरिकेच्या सेंट लुईस, मिसुरी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची घटनेची माहिती अमरनाथ यांची मैत्रीण टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिने दिली होती. X वरील एका पोस्टमध्ये देवोलिनाने भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची विनंती केली होती.

शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय दूतावासाने म्हटले आहे की त्यांनी भारतीय डान्सर अमरनाथ घोष यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा मुद्दा सेंट लुईस पोलिसांसमोर गंभीरपणे उपस्थित करण्यात आला आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, भारतीय दूतावासाने अमरनाथचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

"सेंट लुईस, मिसूरी येथे अमरनाथ घोष याच्या मृत्यूबद्दल त्याचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही फॉरेन्सिक, पोलिसांसोबत तपास आणि मदतीसाठी पाठपुरावा करत आहोत," असे शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "दूतावास अमरनाथ घोषच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करत आहे. सेंट लुईस पोलिस आणि विद्यापीठाकडे या प्रकरणी तपासाची मागणी करण्यात आली आहे." दरम्यान, अमेरिकेत या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक भारतीयांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

कोण होता अमरनाथ घोष? Amarnath Ghosh

अमरनाथ घोष हे कोलकाता येथील असून तो सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठात डान्समध्ये एमएफए करत होता. त्याचे पालक हयात नाहीत, असा खुलासा अभिनेत्री देवोलिनाने केला. 'अमरनाथ हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या आईचे ३ वर्षांपूर्वी निधन झाले होते. लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.' असे तिने म्हटले आहे.
देवोलिनाने पुढे म्हटले आहे की अमरनाथ सेंट लुईस अकादमी परिसरात संध्याकाळी फेरफटका मारत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनी चेन्नईच्या कलाक्षेत्र कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समधून भरतनाट्यममध्ये डिप्लोमा केला होता. त्याला नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सवात नृत्य कनक मणी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याला आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून कुचीपुडीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT