पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पांड्या (71), केएल राहुल (55 धावा) आणि सूर्यकुमार यादव (46) यांनी संधाला मजबूत स्थितीत पोहचवले. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
19 षटकांनंतर भारताने 6 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 25 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. दिनेश कार्तिक सहा धावा करून बाद झाला.
भारताला 16व्या षटकात 146 धावांवर पाचवा धक्का बसला. नॅथन एलिसने अक्षर पटेलला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. अक्षरला पाच चेंडूंत सहा धावा करता आल्या. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 5 बाद 148 होती. सध्या हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक क्रीजवर आहेत.
14व्या षटकात 126 धावांवर भारताला चौथा धक्का बसला. सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याचे अर्धशतक हुकले. त्याला कॅमेरून ग्रीनने यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेलबाद केले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. 14 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद 131 अशी होती.
12 षटकांनंतर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. टीम इंडियाला 12व्या षटकात तिसरा धक्का बसला. केएल राहुल 35 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने नॅथन एलिसच्या हाती झेलबाद केले. राहुलने आपल्या खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. राहुलने सूर्यकुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली.
केएल राहुल फॉर्ममध्ये आला. त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले. राहुलने याआधी आशिया कपमध्ये सुपर फोरच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. राहुलने 32 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक झळकावले.
पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला. हा भारताला दुसरा धक्का होता. यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 35 होती. विराट अवघ्या 2 धावा काढून तंबूत परतला.
तिस-या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याला हेजलवूडनने माघारी धाडले. रोहितने 9 चेंडूत 11 धावा केल्या.
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि हर्षल पटेल.
अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.