Latest

पहिल्यांदाच ४०० अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट साध्य, पीएम मोदी यांच्याकडून शेतकरी, MSME चे अभिनंदन

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

४०० अब्ज डॉलर्स निर्यातीचे ($400 Billion of goods exports) उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी सूक्ष्म आणि लघू उद्योजक (MSMEs) तसेच शेतकऱ्यांचे (farmers) अभिनंदन केले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने चारशे अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट साध्य झाले असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत दिली.

भारताने पहिल्यांदाच चारशे अब्ज डॉलर्स इतक्या किमतीच्या सामानाची निर्यात केली आहे. या यशासाठी आपण शेतकरी, हस्तकला कारागीर, एमएसएमई, विविध वस्तूंचे उत्पादक व निर्यातदारांना शुभेच्छा देतो. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील हा मैलाचा दगड आहे, असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या असोचेमच्या मार्चमध्ये झालेल्या परिषदेत केंद्रीय व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी वर्ष २०२१-२२ मध्ये निर्यातीचे ४०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट सहज पार केले जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यात (एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२) देशाची निर्यात ३७४.०५ अब्ज डॉलर्स इतकी झाली होती. गतवर्षी याच कालावधीत हा आकडा २५६.५५ अब्ज डॉलर्स इतका होता. थोडक्यात निर्यातीत झालेली वाढ ४५.८० टक्के इतकी आहे. गत डिसेंबर महिन्यात ३७ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. एका महिन्यातील निर्यातीचा हा सर्वाधिक आकडा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT