पुढारी ऑनलाईन डेस्क :
मागील २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमधील वाढ कायम राहिली. ( COVID19 cases) देशभरात ८ हजार ८४ नवे रुग्ण आढळले. तर १० जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील काेराेना रुग्णसंख्याचा आकडा ४७ हजार ९९५ झाला आहे.
देशातील दैनंदिन पॉझिटीव्ही रेट हा तीन टक्क्यांवर गेला असून, तो मागील चार महिन्यांनंतर वाढला आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार ५९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात ४ कोटी २६ लाख ५७ हजार ३३५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात रविवारी २ हजार ९४६ नवे रुग्ण आढळले. तर दोघांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात कोरोनाने आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८७० जणांचा बळी घेतला आहे. मुंबईत मागील २४ तासांमध्ये १ हजार ८०३ नवे रुग्ण आढळले. येथे १६ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.