पुढारी ऑनलाइन डेस्क : आतापर्यंत जगात संरक्षण क्षेत्रात भारताची ओळख सर्वात मोठा Defence Importer अशी होती. ती बदलून आता Defence Exporter अशी भारताची ओळख बनत आहे. गेल्या 4-5 वर्षात आपण संरक्षण क्षेत्रात जवळपास 21 टक्के इतकी आयात घटली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन सेमिनार 'स्वावलंबन'ला संबोधित करताना म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, आत्मनिर्भर नौसेनेसाठी पहिल्या स्वावलंबन सेमिनारचे आयोजन होणे हे या दिशेने उचलेले अहम पाऊल आहे. 21 व्या शतकातील भारतासाठी भारतीय सेनेत आत्मनिर्भतेचे लक्ष असणे गरजेचे आहे. 75 indigenous technologies चे निर्माण एक प्रकारचे पहिले पाऊल आहे. आपल्याला सातत्याने याची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने काम करायला हवे आहे. आपले लक्ष्य हे असायला हवे भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा भारतीय नौसेना अभूतपूर्व उंचीवर असेल.
गेल्या आठ वर्षात आम्ही फक्त डिफेन्सचे बजेटच वाढवलेले नाही तर हे बजेट डिफेन्स इकोसिस्टिमच्या विकासासाठी कशा प्रकारे उपयोगात आणता येईल, हे देखील सुनिश्चित केले. याशिवाय मोदी यांनी यावेळी संरक्षण बजेटचा एक मोठा हिस्सा आज संरक्षण उपकरण भारतीय कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी वापरले जात आहे.
त्याचबरोबर युद्धाचे क्षेत्र आता व्यापक होत आहे. आता पूर्वीप्रमाणे फक्त भूदल, नौदल आणि वायूदल एवढीच मर्यादा राहिली नाही तर आता अंतरीक्ष युद्ध, सायबर युद्ध, सामाजिक आणि जैविक युद्धासाठी सुद्धा तयार राहावे लागणार आहे. संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे लागेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.