Latest

Women’s T20 2023 World Cup : भारतासाठी ‘करो या मरो’! बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज सेमीफायनल

अमृता चौगुले

केपटाऊन; वृत्तसेवा : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाची गाठ आज (गुरुवारी) बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामना केपटाऊनमधील न्यूलँडस येथे खेळविला जाणार आहे. (Women's T20 2023 World Cup)

मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडविला. पाकच्या पराभवाने भारताच्या अडचणीत भर पडली. कारण पाक पराभूत झाल्याने भारतीय संघ अव्वल स्थान प्राप्त करू शकला नाही. जर पाकचा महिला संघ विजयी झाला असता तर भारतीय संघ गट 2 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असता. अशा स्थितीत भारताची गाठ गट 1 मधील दुसर्‍या क्रमांकाच्या दक्षिण आफ्रिकेशी पडली असती. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत द. आफ्रिकन संघ तितका मजबूत मानला जात नाही. (Women's T20 2023 World Cup)

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा अडसर दूर करावा लागणार आहे. मात्र, कांगारू संघाला पराभूत करणे सोपे नाही. कारण आजपर्यंतच्या आकडेवारीतही ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत टी-20 मध्ये 30 वेळा गाठ पडली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने तब्बल 22 सामने जिंकले आहेत. तर भारताला केवळ सात सामन्यांत यश मिळाले आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. (Women's T20 2023 World Cup)

भारताविरुद्धच्या गेल्या पाचपैकी चार सामनेही ऑस्ट्रेलियानेच जिंकले आहेत. तर भारताला केवळ एकच विजय साकारण्यात यश मिळाले. दुसरा सेमीफायनल सामना शुक्रवारी इंग्लंड आणि द. आफ्रिका यांच्यात खेळविला जाणार आहे.

मेग लॅॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 प्रारूपात सलग 22 विजय मिळवत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संघानेे शेवटचा पराभव मार्च 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पत्करला होता.

ऑस्ट्रेलियाची कामगिरी पाहता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 'करो या मरो' या निर्धाराने मैदानात उतरावे लागणार आहे. भारताने आपल्या गटात चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडकडून पराभव पत्करला आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.

संभाव्य संघ :

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवनी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हिली, डार्सी ब्राऊन, एश्ले गार्डनर, किम गार्थ, हीथर गॅ्रहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अ‍ॅलाना किंग, तहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिसे पॅरी, मेगान शट, अनाबेल सदरलँड, जॉर्जिया वारेहैम.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT