कोलकाता; वृत्तसंस्था : सर्वच विभागांत आतापर्यंत चांगली कामगिरी करणारा भारत दुसर्या टी-20 (IND vs WI T20) आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजसमोर असेल, तेव्हा विजय मिळवण्यासोबत मालिका आपल्या नावे करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यासोबतच विराट कोहलीच्या फॉर्मकडे देखील नजरा असणार आहेत.
वेस्ट इंडिजच्या संघाला दौर्यावर आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. तीन एकदिवसीय, तसेच पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली असलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून उर्वरित सामन्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
बुधवारी पहिल्या टी-20 मध्ये भारताने सहा विकेटने सहज विजय मिळवला. भारताने ही मालिका जिंकल्यास नियमित कर्णधार नियुक्त झाल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा मालिका विजय असेल. संघाची एकमात्र चिंता ही कोहलीचा फॉर्म आहे. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध 8, 18, 0 आणि 17 धावा केल्या आहेत आणि त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. रोहितला पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजीचे महत्त्व माहीत आहे आणि त्याने पहिल्या टी-20 सामन्यात 19 चेंडूंत 40 धावांची खेळी केली.
रोहितचा सलामीचा साथीदार इशान किशन देखील फॉर्मात दिसला नाही. (IND vs WI T20)
पॉवरप्लेमधील 58 धावांमधील सर्वाधिक धावा रोहितच्या बॅटने आल्या. त्यामुळे तीन विकेट लवकर जाऊनदेखील भारत आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या स्थितीत होता. कोहलीकडे मोठी खेळी करण्याची संधी होती; पण त्याला 13 चेंडूंत 17 धावा करता आल्या. 15 कोटी 25 लाख रुपयांसह आयपीएल 2022 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या इशानला मोकळेपणाने खेळता आले नाही; पण रोहितचा फॉर्म चांगला होता.
भारताने अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला संधी दिल्याने या लढतीत श्रेयस अय्यरला बाहेर ठेवावे लागले. भारतासाठी जलदगती गोलंदाज दीपक चहरची दुखापत चिंतेचा विषय आहे. त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पूर्ण गोलंदाजी करता आली नाही.
पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलार्डच्या संघासाठी हा करो वा मरो सामना असेल. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे तो पहिला टी 20 सामना खेळला नाही. पहिल्या लढतीत निकोलस पूरनने 38 चेंडूंत अर्धशतक झळकावले.
पूरन आणि पोलार्ड यांनी शेवटच्या पाच षटकांत 61 धावा जोडत पहिल्या लढतीत संघाची धावसंख्या 7 बाद 157 पर्यंत पोहोचवली. गेल्या सामन्यात पदार्पण करणार्या स्पिनर रवी बिश्नोईने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अडचणीत आणले. त्यामुळे होल्डरचे पुनरागमन तसेच पूरन आणि पोलार्ड फॉर्मात आल्याने वेस्ट इंडिजचा प्रयत्न चांगली कामगिरी करण्याचा असणार आहे.
स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता (IND vs WI T20)
वेळ : संध्याकाळी 7 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क