Latest

IND vs SA Playing 11 : भारत-द. आफ्रिका कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय, टॉसला विलंब

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून (२६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. येथील खेळपट्टीचा वेगवान गोलंदाजांना फायदा होतो. भारताने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले असून यात एक विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यांनामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेंच्युरियन कसोटीचे पहिले दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. अशा स्थितीत येथे प्रथम खेळणाऱ्या संघासमोर आव्हान असेल. (IND vs SA Playing 11)

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिका आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.  सामन्यात वरूण राजाने हजेरी लावल्याने टॉसला विलंब होत आहे. सततच्या पावसामुळे सेंच्युरियनमधील मैदान ओले झाले आहे. जोरदार पावसामुळे मैदानावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. सध्या, पाऊस थांबला आहे. त्यामुळे भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता पंच खेळपट्टीची पाहणी करून पुढील निर्णय घेणार आहेत.

सेंच्युरियनमध्ये भारताचे आव्हान तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून असेल. कर्णधार रोहित शर्माचे त्याच्या पुल आणि हुक शॉट्सवर कोणते नियंत्रण ठेवू शकतो की नाही? दुसरे म्हणजे, विराट कोहली ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणार्‍या चेंडूंशी छेडछाड करतो की नाही आणि तिसरे म्हणजे, मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो. (IND vs SA Playing 11)

दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी आणि लुंगी एनगिडीसारखे वेगवान गोलंदाज आहेत. अशा स्थितीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यशस्वी जैस्वालची या गोलंदाजांसमोर खरी कसोटी लागणार आहे. त्याचप्रमाणे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनाही येथे आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. विशेषत: उसळत्या चेंडूंवर श्रेयसची कमजोरी सर्वांनाच ठाऊक आहे.

राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी

या कसोटीत केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात येण्‍याची शक्‍यता आहे . केएस भरतपेक्षा त्याला प्राधान्य देऊन अतिरिक्त फलंदाज मैदानात उतरवण्याची योजना आखली जात आहे. राहुलने विश्वचषकात यष्टिरक्षणाची भूमिका चोख बजावली आहे. त्याने कसोटी सामन्यातही विकेटकीपिंग करण्यास होकार दिला आहे.

वेगामुळे प्रसिद्धची बाजू बळकट

प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यशस्वी आणि गिल यांना त्यांच्याच शैलीत खेळू देणार असल्याचं सांगितलं. पण, इथल्या परिस्थितीनुसार स्वत:ला कसं जुळवून घ्यायचं हेही त्यांना सांगण्यात आलं आहे. याबाबत टीम इंडियाचे मुख्‍य प्रशिक्षक राहुल  द्रविड म्हणाले की, भारतीय फलंदाज खेळपट्टीवरील परिस्थितीनुसार निर्णय घेतील. गोलंदाजी करताना मुकेश कुमार नेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे; परंतु गोलंदाजीतील अधिक वेगामुळे प्रसिद्धला संघात स्थान मिळू शकते, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

दक्षिण आफ्रिका संघाची भिस्‍त गोलंदाजांवर

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाकडे डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, कीगन पीटरसन यांसारखे फलंदाज आहेत जे या मालिकेनंतर निवृत्त होत आहेत. हे फलंदाज त्यांच्या परिस्थितीत भारतीय गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात, परंतु बावुमाला त्याच्या वेगवान गोलंदाजांकडून सर्वाधिक आशा असेल.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरे, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT