Latest

IND vs SA Boxing Day Test : बॉक्सिंग डे टेस्टमधून रवींद्र जडेजा का बाहेर? रोहितने सांगितले ‘हे’ कारण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA Boxing Day Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात खेळत नाहीये. कर्णधार रोहित शर्मानेही जडेजाला बाहेर का बसवण्यात आले आहे, याचे कारण स्पष्ट केले आहे.

म्हणून जडेजा बाहेर…

टीम इंडिया या सामन्यात रवींद्र जडेजाशिवाय मैदानात उतरली आहे. रोहित शर्माने टॉसच्या वेळी जडेजा न खेळण्याचे कारण स्पष्ट केले. जडेजाला पाठी दुखीचा त्रास जाणवत असल्याने तो या सामन्यात खेळत नसल्याचे भारतीय कर्णधाराने सांगितले. त्याचवेळी बीसीसीआयनेही सोशल मीडियावर जडेजाबाबत अपडेटही दिली आहे. बीसीसीआयने म्हटलंय की, 'सामन्याच्या सकाळी जडेजाने पाठीच्या वरच्या भागात वेदना होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' (IND vs SA Boxing Day Test)

जडेजा मॅचविनरपैकी एक, पण…

जडेजाने टीम इंडियासाठी आतापर्यंत 67 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाने 36.41 च्या सरासरीने 2804 धावा केल्या आहेत ज्यात 19 अर्धशतके आणि 3 शतकांचा समावेश आहे. या काळात त्याने 275 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने 12 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ पुढील प्रमाणे आहेत…

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका संघ : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने, मार्को जेन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT