Latest

IND vs PAK : आठव्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज

मोहन कारंडे

अहमदाबाद; वृत्तसंस्था : आयसीसी वन डे वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत अनेक चुरशीच्या लढती झाल्या, ज्यात अनेक विक्रमदेखील झाले. पण संपूर्ण क्रिकेटविश्वाला प्रतीक्षा आहे ती भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीची. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत होणार आहे. वन डे वर्ल्डकपच्या इतिहासातील ही दोन्ही संघातील आठवी लढत असेल. आतापर्यंत झालेल्या सात लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांची ही तिसरी मॅच आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा तर पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. आशिया कप 2023 मध्ये भारत-पाक लढत पावसामुळे राखीव दिवशी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT