Latest

Ruturaj Gaikwad : भारताला झटका! ‘हा’ फलंदाज जखमी, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) रांचीमध्ये खेळल्या जाणा-या सामन्यातून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाली असून त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे. गायकवाड या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडेल असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉला संधी दिली जाईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मनगटाच्या दुखापतीमुळे ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिकाही गमावली होती. त्याला या वर्षीही श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. टीम इंडियाने जानेवारीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध शुभमन गिल आणि इशान किशनला सलामीला संधी दिली.

याआधीही दुखापतीमुळे ऋतुराज (Ruturaj Gaikwad) खूप त्रस्त होता आणि याच कारणामुळे त्याने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी गमावली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे गायकवाड गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकला नव्हता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर पडला होता. आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. मात्र, ऋतुराजच्या जागी टीम इंडियात कोणाला स्थान मिळणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ऋतुराजने टीम इंडियासाठी आतापर्यंत 9 टी-20 सामने खेळले आहेत आणि यात त्याने 135 धावा केल्या आहेत. त्याने एक वनडे सामनाही खेळला आहे. मात्र, त्यानंतर तो भारताकडून खेळू शकला नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. हा त्याचा पहिला वनडे सामनाही होता.

टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ :

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, ऋतुराज गायकवाड/पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ :

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेन क्लीव्हर, डेव्हॉन कॉनवे, शेन डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपली, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT