Latest

IND vs NZ 3rd ODI : तिसरा वनडे सामना रद्द , न्‍यूझीलंडने मालिका जिंकली

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्‍यूझीलंड वनडे मालिकेतील अखेरचा तिसरा सामना आज (दि.३०) पावसामुळे रद्द झाला. तीन सामन्‍यांची मालिका न्‍यूझीलंडने १-० अशी जिंकली आहे. आजच्या सामन्यात न्‍यूझीलंडने नाणेफक जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा डाव २१९ धावांवर आटोपला. या आव्‍हानांचा पाठलाग करताना १८ षटकामध्‍ये १ गडी गमावत न्‍यूझीलंडने १०४ धावा केल्‍या होता. यानंतर पाऊस आला. अखेर पंचांनी सामना रद्द केल्याचा जाहीर केले.

भारताच्‍या डावाची पडझड

क्राइस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हल मैदानावर झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने सावध सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी संथ सुरुवात केली. नवव्‍या षटकात ३९ धावांवर भारताला पहिला धक्‍का बसला मिल्‍ने याने शुभमन गिलला तंबूत धाडले. गिल २२ चेंडूत १३ धावांवर बाद झाला. त्‍याला ॲडम मिल्नेने मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले.  त्यानंतर ४५ चेंडूत २८ धावांवर शिखर धवन तंबूत परतला. यानंतर भारताला सलग दोन धक्‍के बसले. २५ व्या षटकामध्‍ये भारताला चौथा धक्का बसला. मिल्नेने सूर्यकुमार यादवला माघारी पाठवले. साउदीने त्याचा झेल घेतला.यानंतर२६ व्या षटकांत फर्ग्यूसनने श्रेयस अय्यरला अर्धशतक पूर्ण करण्यापासून रोखले. ८ चौकारांच्‍या मदतीने अय्यर ४९ धावा केल्‍या. कॉन्वेने त्याचा झेल टिपला.

वाॅशिंग्टन सुंदरचे दमदार अर्धशतक

एकीकडे डावाची पडझड सुरु असताना वाॅशिंग्टन सुंदरने चिवट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्‍याच्‍या फलंदाजीने भारताचा डाव सावरला. ३३ व्या षटकांत भारताला आणखी एक धक्का बसला. दीपक हुड्डा हा झेलबाद झाला. 170 धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. दीपक चहर नऊ चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर युजवेंद्र चहल २२ चेंडूत ८ धावा करून माघारी परतला. 40 षटकांनंतर भारताची धावसंख्या 7 विकेट 180 अशी आहे. पाच चौकार आणि एका षटकाराच्‍या मदतीने वाॅशिंग्टन सुंदरने ६४ चेंडूमध्‍ये ५१ धावा केल्‍या. ४८ व्‍या षटकामध्‍ये झटपट धावा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात सुंदरला साउदीने बाद केले. भारताचा डावा २१९ धावांवर आटोपला.

मिशेल आणि सँटनरचा प्रभावी मारा

न्‍यूझीलंडच्‍या डॅरिल मिशेल आणि मिचेल सँटनर यांच्‍या मार्‍यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या दोघांनी प्रत्‍येकी ३ बळी घेतले. टीम साउदीने २ तर मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्‍येकी १ विकेट घेतली.

फिन ऍलनचे दमदार अर्धशतक

२२० धावांच्‍या आव्‍हानाचा पाढलाग करताना न्‍यूझीलंडने ९ नवव्‍या षटकापर्यंत सावध सुरुवात केली आहे. विनाबाद ४३ धावा केल्‍या. मात्र दहाव्‍या षटकात दीपक चेहरला चार षटकात खेचत विनाबाद ५९ धावा केल्‍या. सलामीवीर फिन ऍलन २६ धावांवर तर डेव्हॉन कॉनवे २४ धावांवर खेळत आहेत. १० व्‍या षटकात कॉनवेने १६ धावा फटकावल्‍या. १३ व्‍या षटकानंतर न्‍यूझीलंडने नाबाद ७९ धावा केल्‍या आहेत. सलामीवीर फिन ऍलन याने दमदार सात चौकार आणि एका षटकारच्‍या जोरावर दमदार अर्धशतक झळकावले.

न्‍यूझीलंडला पहिला धक्‍का

१७ व्‍या षटकामध्‍ये उमरान मलिक याने फिन ऍलनला याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. न्‍यूझीलंडने १८ व्‍या षटकामध्‍ये १ गडी गमावत १०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला आहे. १८ षटकानंतर न्‍यूझीलंडने एक गडी गमावत १०४ धावा केल्‍या आहेत. पावसामुळे खेळ थांबविण्‍यात आला आहे. अखेर पंचांनी सामना रद्द केल्याचा जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT