पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (दि.२ ) भारताने बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. पावसामुळे या सामन्याची सारे समीकरणच बदलली. आता पराभवामुळे बांगलादेश संघातील खेळाडूंनी रडीचा डाव सुरु केला आहे. ( Virat in fake fielding row ) अखेरच्या षटकात २५ धावा करणारा फलंदाज, बांगलादेशचा विकेट किपर नुरुल हसन याने विराट कोहलीवर 'फेक फील्डिंग'चा आरोप क्रिकेट जगताचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. नुरुल याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर 'फेक फील्डिंग'चा आरोप केला आहे.
सामना संपल्यानंतर माध्यमाशी बोलताना नुरल हसन म्हणाला की, "मैदानावरील पंचांनी विराट कोहलीच्या 'फेक फील्डिंग'कडे दुर्लक्ष केले. बांगलादेश फलंदाजी करताना सामन्यातील सातव्या षटकामध्ये अर्शदीप सिंह गाोलंदाजी करत हाोता. यावेळी कोहली याने चेंडू पकडत तो नॅान-स्ट्राइकर एन्डला फेकत असल्याचे भासवले. याकडे मैदानातील पंच मरॅस इरास्मस आणि क्रिस ब्राऊन यांनी पाहिलेच नाही. फलंदाजांचेही याकडे दुर्लक्ष झाले."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी ) नियम ४१.५ नुसार क्षेत्ररक्षकांनी फलंदाजाचे लक्ष विचलित करत त्यांची एकाग्रता भंग केल्यास तो चेंडू डेड बॅाल म्हणून घाोषित केला जाताो. फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा मिळतात.
माध्यमांशी बोलताना नुरुल म्हणाला की, " विराटने केलेल्या फेक फील्डिंगकडे पंचाचे दुर्लश झाले. पावसामुळे मैदान ओले झाले होते. भारताच्या या चुकीबद्दल आम्हाला पाच धावा मिळाल्या असता तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. दुर्दैवानेअसे झाले नाही."
भारत -बांगलादेश सामन्यावेळी १६ व्या षटकामध्येही वाद झाला होता. यावेळी विराट कोहलीला हसन महमूद गोलंदाजी करत होता. हसन याने बाउंसर टाकला. हा चेंडू फटकावत विराटने एक धाव मिळवली. हा चेंडू नो बॅाल असल्याने .विराटने पंचांना सां.गितले. पंचानीही हा चेंडू नो बॅाल ठरवला. यावर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन नाराज झाला. तो पंचाकडे जावू लागला. यावेळी विराटने शाकिबला अडवले. शाकिबचा राग शांत झाला. काही क्षणातच शाकिब आ.णि विराट एकमेकांवर हसताना दिसले.