पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने झुंझार शतक झळकावले. रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधील हे ४३ वे शतक ठरले आहे. तर कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक आहे. रोहितने यावर्षी २४ जानेवारीला न्यूझीलंड विरुद्ध शतक झळकावले होते. कर्णधार म्हणून तिन्ही फॉर्मेट शतक झळकविणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. ( Rohit Sharma century )
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित ५६ धावांवर नाबाद होता. आज सकाळी भारताची सुरुवात चांगली झाली. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाजाने आर. अश्विनपाठोपाठ चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना स्वस्तात तंबूत धाडले. एकीकडे ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू मॅर्फी व नॅथन टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना चकवत असतानाच रोहित शर्माने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आपलं शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma century ) आत्मविश्वासाने भरलेल्या या खेळीत १७१ चेंडूत त्याने १४ चौकार आणि २ षटकार फटकावले.
लंचनंतर ५३ व्या षटकात मर्फीने भारताला तिसरा धक्का दिला. विराट कोहली १२ धावांवर बाद झाला. ४१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने भारताला दुसरा धक्का दिला. मर्फीने २३ धावांवर खेळत असणार्या अश्विनला पायचीत केले. यानंतर ४४ व्या षटकामध्ये भारताने मर्फीने पुजाराला बाद केले. तो ७ धावांवर बाद झाला.
रविंद्र जडेजा (5 बळी) आणि आर अश्विन (3 बळी) यांच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने नागपूर कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 177 धावांत गारद झाल्यानंतर प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 77 धावा केल्या होत्या .
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रोहित आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार मारून रोहितने आपले इरादे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाने चौथ्या षटकातच नॅथन लायनकडे चेंडू सोपवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये टॉड मर्फीने ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. त्याने राहुलची विकेट घेतली. राहुल 71 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित ५६ धावांवर नाबाद होता.