Latest

भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना! दुबई स्टेडियमच्या एन्ट्री गेटजवळ भीषण आग (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी मोठी घटना घडली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दुबई स्टेडियमबाहेर आग लागल्याची घटना समोर आली आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवतोडून काम केले. सध्या आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र या दुर्घटनेमुळे टॉसची वेळ बदलली जाण्याची शक्यता आहे. स्टेडियमच्या एंट्री गेटजवळील एका इमारतीत ही आग लागल्याने धूर संपूर्ण स्टेडियमभोवती पसरल्याचे एका स्टेडीयम व्यवस्थापनाने सांगितले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया कपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा स्पर्धेतील शेवटचा सामना असेल. दोन्ही संघ आशिया चषक 2022 ला विजयासह अलविदा करण्याचा प्रयत्न करतील.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. सध्या टीम इंडियाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, जरी शेवटचे दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाच्या अनेक कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. या सामन्यात टीम इंडिया खेळातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडियाचे सर्वाधिक लक्ष परिपूर्ण प्लेइंग-11 तसेच अचूक खेळ नियोजनावर असेल. या दोन गोष्टींबाबत टीम इंडियावर सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे, अफगाणिस्तानही जबरदस्त लयीत आहे पण त्यांनाही त्यांचे शेवटचे दोन सामने गमवावे लागले आहेत. अफगाणिस्तानकडे राशिद खान, मुजीब उर रहमान, फजल हक सारखे बलवान गोलंदाज आहेत, जे कमी धावसंख्येवर कोणत्याही संघाला रोखण्यास सक्षम आहेत. संघात हजरतुल्ला झाझाई आणि रहमानउल्ला गुरबाजसारखे टी-20 स्पेशालिस्ट फलंदाज आहेत, जे मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT