Latest

आयटीआर रिफंड मिळाला नसल्यास, तर त्यामागे ‘ही’ कारणे असू शकतात

Arun Patil

प्राप्तिकर विभागाच्या नवीन संकेतस्थळामुळे प्राप्तिकर विवरण भरणे बर्‍याच अंशी सुलभ झाले आहे. यानुसार वेळेत प्राप्तिकर (Income Tax) विवरणपत्र दाखल केल्यास रिफंड म्हणजेच परतावाही वेळेतच जमा होईल. पण आयटीआर वेळेत देऊनही रिफंड मिळाला नसेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

तांत्रिक बिघाड : प्राप्तिकर (Income Tax) विभागाने जून 2021 मध्ये नवीन पोर्टल आणले. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाडाच्या समस्या निर्माण झाल्या. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चादेखील झाली. त्यामुळे अशा प्रकारे तांत्रिक कारणांमुळेदेखील आपले आयटीआर रिफंड मिळण्यास विलंब झालेला असू शकतो.

कागदपत्रांची पूर्तता नाही : अतिरिक्त कागदपत्रे जमा केलेली नसल्यास रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कर अधिकार्‍यांशी चर्चा करू शकता आणि कागदपत्रे पुन्हा जमा करू शकता.

व्हेरिफिकेशन न करणे : रिफंड न मिळण्यामागे आणखी एक कारण म्हणजे व्हेरिफिकेशन नसणे. आयटीआरचे निश्चित वेळेत व्हेरिफिकेशन झाले नाही, तर ते आयटीआर मान्य केले जात नाही. प्राप्तिकर विभागाच्या अधिनियम 1961 नुसार व्हेरिफाय न केलेले आयटीआर ग्राह्य धरले जाणार नाही, असे म्हटले आहे.

बँकेशी निगडित माहिती : बँक डिटेलमध्ये काही बदल झाले असेल, तर आपल्याला रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो. आपल्या प्राथमिक खात्याच्या मोबाईल नंबर आणि ई-मेलची खातरजमा नवीन खात्याकडून होत असेल, तर नवीन खाते ग्राह्य धरले जाईल. खात्यात झालेला बदल हा पोर्टलवर इशारेवजा सूचनेतून पाहावयास मिळू शकतो.

असा तपासा रिफंड

* यूजर आयडी पासवर्डचा उपयोग करून प्राप्तिकर पोर्टलवर लॉगइन करा.
* माय अकाऊंटला जाऊन रिफंड/डिमांड स्टेट्सवर क्लिक करा.
* यानंतर माहिती समोर येईल. रिफंड केले नसेल, तर आपण 'कारण'वर क्लिक करून त्याच्या स्थितीची माहिती मिळवू शकता.

अपर्णा देवकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT