Latest

काँग्रेस, तृणमूल, शिवसेना व आप भ्रष्टाचाराचे चार खांब : शहजाद पुनावाला

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि आप हे पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची चार खांब आहेत, असे वर्णन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले आहे. शहजाद यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ट्विट करून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि आपवर टिका केली आहे. त्यांनी या चारही पक्षांना लोकशाहीच्या चार खांबे या संकल्पनेप्रमाणे भ्रष्टाचाराची चार खांबे अशी उपमा दिली आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे, INC चा लाँगफॉर्म Indian National Congress नाही तर I need corruption मला भ्रष्टाचाराची गरज आहे, असे वर्णन केले आहे.   तर TMC तृणमूल काँग्रेस चा लाँगफॉर्म Too Much Corruption असा केला आहे. त्यानंतर माजी महा मुख्यमंत्री असे म्हणत उद्धव ठाकरे यांची शिवसेना भ्रष्ट पक्ष असा उल्लेख केला आहे आणि चौथा आणि शेवटचा आम आदमी पक्ष 'आप' हा होय, असे शहजाद यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या ट्वीटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शहजाद यांनी 2017 मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ते वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होते. भाजपने जेव्हा त्यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नेमणूक केली तेव्हा त्यांच्या विषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT