Rajasthan New CM Update 
Latest

Assembly Election Result 2023 : चार पैकी तीन राज्यात भाजप, पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाचे श्रेय

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चारही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यापैकी तीन राज्यात मिळालेल्या विजयाचे श्रेय भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आले आहे. भाजपने सत्ता मिळवलेल्या राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये भाजपचे आजी-माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, प्रमुख नेते असले तरी भाजपच्या गोटातून तिन्ही राज्यातील निवडणुकांच्या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा पुढे केल्याचे चित्र आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियाही खूप बोलक्या आहेत. (Assembly Election Result 2023)

आमचे डबल इंजिन सरकार, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिल्लीत केलेले काम, आमच्या सरकारने राबवलेल्या योजना सर्व वर्गांना आवडल्या. चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतून देशातील जनतेने पुन्हा एकदा आपला कल कोणाकडे आहे ते सांगितले आहे. या नेत्रदीपक विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सर्व नेत्यांचे आभार त्यांच्या मार्गदर्शनामुळे निवडणूक प्रचाराला योग्य गती आणि दिशा मिळाली त्यामुळेच हे मोठे यश आम्ही मिळवू शकलो.
– शिवराजसिंह चव्हाण, मुख्यमंत्री मध्य प्रदेश

"हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राचा आणि त्यांनी दिलेल्या हमीचा आहे. तसेच हा विजय अमित शाह यांनी दिलेल्या रणनीतीचा, जे पी नड्डा यांनी दिलेल्या सक्षम नेतृत्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे."
– वसुंधरा राजे सिंधिया, माजी मुख्यमंत्री राजस्थान

आमच्या सोबत जनता आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही. या जनादेशासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. छत्तीसगडच्या जनतेच्या सेवेसाठी माझे जीवन अंतिम क्षणापर्यंत समर्पित असेल.
– डॉ. रमण सिंह, माजी मुख्यमंत्री छत्तीसगड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आमच्या सरकारने जे काम केले त्याचा स्वीकार आणि समर्थन देशातील जनतेने केला आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील भाजप नेते आणि जनतेचे अभिनंदन करतो.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

२०२३ च्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय हा राज्यातील जनतेचा विजय आहे. काँग्रेसचे खोटे, फसवे आणि विभाजनाचे राजकारण नाकारून जनतेने भाजपला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 'सबका साथ, सबका विकास' हे धोरण जनतेने स्वीकारले आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण तथा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहे
– ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री

भारतीय जनता पक्षाच्या या महाविजसाठी मध्य प्रदेशच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा, जनतेद्वारे त्यांना मिळालेल्या प्रेमाचा हा विजय आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह त्यांच्या सरकारने संचालित केलेल्या योजनांचा हा विजय आहे.
–  नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री तथा उमेदवार

"मी म्हणालो होतो की २००३ ची पुनरावृत्ती २०२३ मध्ये होत आहे आणि आज निकालात ते दिसून येते. मी मध्य प्रदेशातील जनतेचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या निवडणुकीत काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे.
– प्रल्हाद सिंह पटेल, केंद्रीय मंत्री तथा नरसिंगपूर येथील भाजपचे उमेदवार

लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे आणि हे निवडणूकीचे निकाल याचा पुरावा आहे. पंतप्रधान मोदींची हमी कामी आली.
– धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री

"मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. ते आमचे नेते आणि प्रेरणास्त्रोत आहेत. भाजप कार्यकर्ते, झोटवाडा आणि राजस्थानच्या लोकांनी मला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजस्थानची सेवा करण्याची संधी दिली. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींचे आहे. ज्या विश्वासाने त्यांच्या योजना प्रत्येक घराघरात पोहोचतात, त्या आशीर्वादानेच भाजप इतका मोठा विजय मिळवत आहे.
– राज्यवर्धन सिंह राठोड, भाजप खासदार आणि झोटवाडा येथील उमेदवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि जनतेचा विश्वास हे निवडणुकीच्या विजयाचे समीकरण आहे. छत्तीसगडमध्येही हेच समीकरण लागू आहे.
– मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT