फोटो गॅलरी

दिशाची मादक अदा पाहून चाहतेही बेहोश

backup backup

नवी दिल्ली : दिशा पाटनी ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुपर हॉट अ‍ॅक्ट्रेस आहे. आपल्या हॉटनेसने ती इंटरनेटवर नेहमीच खळबळ उडवून देत असते. ज्यावेळी ती आपले एखादे छायाचित्र अथवा व्हिडीओ शेअर करते, त्यावेळी ते प्रचंड वेगाने व्हायरल होते. दिशाचा एक नवा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवून देत आहे.

दिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या हॉट छायाचित्रांचा एक कोलाज करून व्हिडीओ शेअर केला आहे. तिने आपल्या सिजलिंग लूकने चाहत्यांना दिवाना बनविले आहे. या व्हिडीओत दिशा ही शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे. दिशाच्या या व्हिडीओला केवळ एका तासात दीड लाखाहून जास्त व्ह्यूव्ज मिळाले. चाहत्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये फायर इमोजींचा पाऊस पाडला आहे.दरम्यान, यापूर्वी दिशाने समुद्र किनार्‍यावरचा आपला एक विडिओ शेअर केला होता. त्याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कॉमेंट केली होती.

SCROLL FOR NEXT