Bhagavad Gita Pinterest
फोटो गॅलरी

Bhagavad Gita: यश आणि आनंदासाठी भगवद्गीतेतील 'हे' उपदेश माहीत आहेत का? बदलून जाईल तुमचं आयुष्य!

भगवद्गीतेतील काही अत्यंत प्रभावी शिकवणी, ज्या तुम्हाला तुमचे जीवन योग्य दिशेने नेण्यास मदत करतील...

मोहन कारंडे

'भगवद्गीता आपल्याला काय शिकवते?' हा एक मोठा प्रश्न आहे जो आपण अनेकांना विचारतो. भगवद्गीतेमध्ये असा प्राचीन ज्ञानसाठा सामावलेला आहे, जो आधुनिक जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जाणून घेऊया भगवद्गीतेतील काही अत्यंत प्रभावी उपदेश, जे तुम्हाला तुमचे जीवन योग्य दिशेने नेण्यास मदत करतील...

१. तुमचे विचारच तुमचे नशीब घडवतात

भगवद्गीतेनुसार, माणूस हा त्याच्या विचारांनीच घडतो किंवा बिघडतो. जर तुमचे विचार सकारात्मक आणि दृढ असतील, तर तुम्ही कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. परीक्षेला सामोरे जाताना किंवा कामाच्या ठिकाणी सादरीकरण करताना, जर तुमचे मन शांत आणि सकारात्मक असेल, तर तुमच्या यशाची शक्यता कित्येक पटीने वाढते.

२. मन: मित्र की शत्रू?

गीतेत म्हटले आहे की, "तुमचे मनच तुमच्या बंधनाला आणि तुमच्या मुक्तीला कारणीभूत आहे." आपले विचार सतत बदलत असतात. जर आपण आध्यात्मिक सराव आणि शिस्तीने मनाला योग्य वळण लावले, तर हेच मन आपला सर्वात मोठा मित्र बनते. मात्र, मनावर ताबा नसल्यास, ते आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे काम करते.

३. कर्म करा, फळाची अपेक्षा नको

आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'अपेक्षा'. गीता आपल्याला शिकवते की, कर्म करणे आपल्या हातात आहे, पण त्याचे फळ नाही. जेव्हा आपण फळाची चिंता न करता पूर्ण निष्ठेने काम करतो, तेव्हा तणाव राहत नाही. अपेक्षाभंग टाळण्यासाठी 'निष्काम कर्म' हाच सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे.

४. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार

आपण या जगात काहीही घेऊन आलेलो नाही आणि जातानाही काही सोबत नेणार नाही. मग अशा गोष्टींची चिंता का करायची ज्या कायमस्वरूपी आपल्या नाहीत? हे सत्य स्वीकारल्यास माणसाचा हव्यास कमी होतो आणि तो वर्तमानात जगू लागतो.

५. बदल हाच सृष्टीचा नियम आहे

सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. आज जो करोडपती आहे, तो उद्या गरिबीत असू शकतो आणि आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो. परिस्थिती कधीच स्थिर नसते. त्यामुळे सुखात हुरळून न जाता आणि दुःखात खचून न पडता 'स्थितप्रज्ञ' राहणे गरजेचे आहे.

६. निष्काम कर्म आणि जबाबदारी

फळाची आसक्ती न धरता केलेले 'निष्काम कर्म' माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण जबाबदारीने पार पाडणे, पण त्यात गुंतून न पडणे हेच 'कर्मयोग' आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT