पुढारी ऑनलाईन डेस्क : बीटेक पदवीचे विद्यार्थी तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर कोर्समधून बाहेर पडू शकतात अशी सुविधा आयआयटी मुंबईमार्फत (IIT-Bombay) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ उठवत पंधरा विद्यार्थ्यांनी बीटेक कोर्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (IIT-Bombay BSC, Engineering)
आयआयटी कौन्सिलच्या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान एक मह्त्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राध्यापक महाजन यांनी दिली. बीटेक कोर्सदरम्यान कमी कामगिरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्याला सन्मानपूर्वक बाहेर पडता यावं आणि केलेल्या अभ्यासाचा फायदा व्हावा हा यामागचा उद्देश आहे. (IIT-Bombay BSC, Engineering)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत, आयआयटी-मुंबईकडून ४ वर्षांचा बीटेक प्रोग्राम पूर्ण करू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना लवकर बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्लेसमेंटमध्ये सहभागी होता येणार आहे. याचे कारण म्हणजे आयआयटी मार्फत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कमी कामगिरी झाल्यानंतर काही विद्यार्थी हा कोर्स अपूर्ण ठेवत असायचे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीन वर्षांची अभियांत्रिकी क्षेत्रीतील बीएससी पदवी मिळवून देणे हा याचा हेतू आहे.
जे विद्यार्थी चार वर्षांचा बी.टेक कोर्स पूर्ण करू शकत नाहीत किंवा कोर्स सोडू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आयआयटीकडून अभियांत्रिकी मधील बीएससी पदवी देण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. मात्र, यासाठी बीटेकचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना ड्रॉप-आउट म्हणून लेबल देण्याऐवजी बाहेर पडत असताना केलेल्या कोर्सचा फायदा उठवता येईल यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हेही वाचा