पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरफड पाहिली कि सगळ्यात आधी आठवण येते ती तिच्या आरोग्यदायी गुणांची. कोरफड औषध म्हणून उपयोगी आहेच. पण सौन्दर्यप्रसाधन म्हणूनही बहुगुणी आहे. चवीला फारशी सुखद नसली तरी अनेकजण तिचा ज्यूस पिण पसंत करतात. अनेकजण घरी कोरफडीची लागवड करतात आणि त्याच्याच ताजा ज्यूस पिण पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? कोरफडीच्या जवळपास 600 प्रजाती आहेत. त्यातील काही प्रजाती या विषारी मानल्या जातात. अनेकदा विषारी कोरफडीचं सेवन केल्यास जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे बिनविषारी कोरफड कशी ओळखावी याबाबत काही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
सगळ्याच कोरफडी विषारी असतात का ?
कोरफडीच्या काही गुणांवर अजूनही संशोधन सुरू आहे. पण कोणतीही शहानिशा केल्याशिवाय कोरफडीचा वापर करू नये.
अशी ओळखा वापरायोग्य कोरफड :
मोठी टोकदार पाने जी बाहेरच्या बाजूला झुकलेली असतील.
पानाच्या काठाला निघालेले छोटे छोटे काटे
वरच्या दिशेने वाढणारी पाने
झाडाच्या मध्यातून उगवणारी पाने
पानांचा गर्द हिरवा रंग
कोरफडीची बार्बेडोस ही प्रजाती खाण्यायोग्य समजली जाते.