Womens World Cup : रोमांचक वनडेत ऑस्ट्रेलियाचा विजय, इंग्लंडच्या फलंदाजांच्या शतकी खेळी व्यर्थ  
Latest

Womens World Cup : रोमांचक वनडेत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १२ धावांनी विजय!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 12 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 310 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ आठ गडी गमावून 298 धावा करू शकला आणि सामना गमावला. ऑस्ट्रेलियाच्या रॅचेल हेन्सला तिच्या शानदार शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत. इंग्लंडने चार वेळा तर ऑस्ट्रेलियाने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाची जबरदस्त फलंदाजी

हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांची पहिली विकेट 35 धावांवर पडली, मात्र त्यानंतर रॅचेल आणि कॅप्टन लेनिंग यांनी 196 धावांची विक्रमी भागीदारी केली. रेचलने 130 धावा केल्या. तर लेनिंगने 86 धावांची खेळी साकारली. यानंतर मुनी (27) आणि पेरी (14) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून 310 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून नेट कॅम्पने दोन आणि ब्रंटने एक विकेट घेतली.

शिविरचे शतक व्यर्थ

ऑस्ट्रेलियाच्या 310 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. संघाची पहिली विकेट शून्य धावसंख्येवर पडली, पण बेमाऊंट आणि नाइट यांनी 92 धावांची भागीदारी करत डावा सांभाळला. यानंतर नताली शिविरने सर्वोत्तम खेळी करत शतक (109*) झळकावत आपल्या संघाला सामन्यात आणले. मात्र, दुसऱ्या टोकाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत इंग्लंडला 298 धावांत रोखले आणि 12 धावांनी विजय मिळवला.

इंग्लंडकडून नताली सिविरने नाबाद 109 धावा केल्या. तर बेमाउंट 74, नाइट 40, सोफिया 28 आणि ब्रंटने 25 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून किंगने तीन, मॅकग्रा आणि जॉन्सनने प्रत्येकी दोन आणि स्कटने एक बळी घेतला.

दोन्ही संघांमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत एकूण 82 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. त्याने एकूण 56 सामने जिंकले आहेत, तर 22 सामने गमावले आहेत. एक सामना बरोबरीत राहिला आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT