Latest

Under-19 World Cup 2024 : बांगला देशविरुद्ध भारताची सलामी आज

Arun Patil

ब्लोमफौंटेन, वृत्तसंस्था : आयसीसी यू-19 विश्वचषक (Under-19 World Cup 2024) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलेल्या, विद्यमान विजेत्या भारतीय संघाची यंदाची मोहीम शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या लढतीने सुरू होत आहे. भारताचा या स्पर्धेसाठी अ गटात समावेश असून, मँगऊआंग ओव्हलवरील या लढतीनंतर संघाच्या पुढील दोन लढती आयर्लंड व अमेरिकेविरुद्ध होणार आहेत.

सन 2002 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकल्यानंतर भारताने त्यानंतर 2008, 2012, 2018 व 2022 मधील आवृत्तीतही जेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. यंदाची स्पर्धा ऐन मोक्याच्या क्षणी काही अपरिहार्य कारणामुळे श्रीलंकेतून दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. प्रत्येक गटातील तीन अव्वल संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 6 व 8 फेब्रुवारीला दोन उपांत्य सामने व दि. 11 फेब्रुवारीला बेनोनी येथे फायनल खेळवली जाणार आहे.

महाराष्ट्राचा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी, यष्टिरक्षक-फलंदाज अरावेल्ली अवनिश, डावखुरा फिरकीपटू व उपकर्णधार सौमी कुमार पांडे, सहरन यांच्यामुळे भारतीय संघ बराच मजबूत आहे. यापैकी सहरन मूळचा राजस्थानचा असला तरी सर्व वयोगटांतील स्पर्धांत तो पंजाब राज्याचे प्रतिनिधीत्व करत आला आहे. यापूर्वी यू-19 चॅलेंजर स्पर्धेतील 4 लढतींत त्याने 4 अर्धशतकांसह 297 धावांची आतषबाजी केली आहे. मुंबईचा मुशीर खानदेखील आश्वासक खेळाडूंपैकी एक असून, त्याने 1 शतक, 2 अर्धशतकांसह 268 धावांचे योगदान दिले आहे.

भारत वि. बांगला देश (Under-19 World Cup 2024)
स्थळ : ब्लोमफौंटेन
वेळ : दुपारी 1.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT