पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या माण्य केल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले आहेत. (Maratha Reservation ) दरम्यान, जरांगे-पाटील सभास्थळी पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत उपोषणस्थळी पोहोचले आहेत. वाशीत मनोज जरांगे पाटलांची विजयी रॅली निघाली. (Maratha Reservation )
संबंधित बातम्या –
दरम्यान, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये आनंदोत्सव सुरु आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले- विधानसभेत कायदा करता येणार आहे. राज्यभर मराठा समाजाचा जल्लोष असेल. मराठा समाजासाठी सदैव लढत राहणार. विजयी सभेची घोषणा अंतरवाली सराटीतून करणार. अनेकांचे ट्रॅप हाणून पाडले. आंदोलन स्थगित करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.