Latest

Sunil Gavaskar : मरणापूर्वी मला ते दोन क्षण पुन्हा अनुभवायचे आहेत : गावसकर

Shambhuraj Pachindre

चेन्नई; वृत्तसंस्था : कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आणि महेंद्रसिंग धोनीने 2011 च्या विश्वचषकात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हे माझ्यासाठी खूप खास क्षण होते. मला माझी शेवटची इच्छा कोणी विचारली तर हे दोन क्षण मला मरण्यापूर्वी पुन्हा बघायचे आहेत, असे मी सांगेन, अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंग धोनीविषयी आपली भावना स्पष्ट केली. धोनीकडून टी शर्टवर ऑटोग्राफ घेण्याच्या कृतीविषयी विचारले असता गावसकर यांनी हे विधान केले. (Sunil Gavaskar)

आयपीएल 2023 च्या साखळी फेरीतील शेवटच्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह संपूर्ण संघाने चेपॉक स्टेडियमवर चेन्नईच्या चाहत्यांसमोर लॅप ऑफ ऑनर केला. या दरम्यान, सुनील गावसकर आणि धोनी यांचा समावेश असलेल्या एका घटनेने संपूर्ण जगाची मने जिंकली. सामन्यानंतर माही चाहत्यांमध्ये गेला आणि त्यांना सीएसकेची जर्सी भेट म्हणून दिली. त्यावेळी गावसकर धावतच धोनीकडे आले आणि त्याला ऑटोग्राफ मागितला. यानंतर धोनीने गावसकरला त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आता गावसकर यांनी या संपूर्ण घटनेमागची कहाणी सांगितली आहे. (Sunil Gavaskar)

धोनीचे कौतुक करताना सुनील गावसकर म्हणाले, त्याने स्वत:ला ज्या पद्धतीने हाताळले ते खरोखरच अद्भुत आहे. सामना संपल्यानंतर सीएसके मैदानावर फेरफटका मारणार आहे हे कळताच मी लगेच पेन घेण्यास सांगितले आणि धोनीकडे पोहोचलो. कारण मला या खास क्षणाचा भाग व्हायचे होते. मी धोनीला ऑटोग्राफसाठी विनंती केली. धोनीने ते मान्य केले. माझ्यासाठीही तो खूप भावनिक क्षण होता. आपला मुद्दा पुढे नेत सुनील गावसकर म्हणाले की, कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकाची ट्रॉफी उचलली आणि महेंद्रसिंग धोनीने 2011 विश्वचषकात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला हे माझ्यासाठी खूप खास क्षण होते. मला माझी शेवटची इच्छा कोणी विचारली तर हे दोन क्षण मरण्यापूर्वी पुन्हा बघायचे आहेत, असे मी सांगेन.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुनील गावसकर गेल्या तीन दशकांपासून समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडले गेले आहेत. यादरम्यान त्यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीसारखे फलंदाज पदार्पणापासूनच दिग्गज बनताना पाहिले आहेत.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT