IPL 2024

David Warner : डेव्हिड वॉर्नर निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार? म्हणाला, ‘मी खेळणे बंद केल्यावर…’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला भारत देश आवडतो. त्यामुळे येथे वेळ घालवायला मला आवडेल, अशी भावना त्याने बोलून दाखवली आहे. आयपीएलशी त्याचे सर्वात प्रदीर्घ आणि यशस्वी नाते आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो परदेशी क्रिकेटर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत भारत आणि इथल्या लोकांबद्दल त्याने दिलखुलासपणे भावना व्यक्त केली.

वॉर्नर (David Warner) केवळ ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य म्हणून भारतात येत नाही, तर आयपीएल खेळण्यासाठी तो वर्षातील जवळपास तीन महिने भारतात राहतो. तो सात वर्षे सनरायझर्स हैदराबादसोबत राहिला. याशिवाय, तो दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग यापूर्वीही होता आणि आता पुन्हा या संघाचा भाग आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर भारतीय चित्रपटांबद्दल बोलतो आणि स्वत: बनवलेले रील्स आणि शॉर्ट्स देखील शेअर करतो. भारतीय चित्रपट निर्मात्यांनीही त्याचा जाहिरातींमध्ये वापर करण्यास सुरुवात केली आहे. भारत देश म्हणजे त्याचे दुसरे घर आहे, असे तो आवर्जुन सांगतो.

आर अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना वॉर्नर म्हणाला, 'माझे भारतात घर नाही. मी इथे एक घर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. बरेच लोक मला विचारतात की मला इथे घर हवे आहे का? जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईन त्यानंतर मला भारतात काही वेळ घालवायचा आहे.

तो पुढे म्हणाला, 'भारतातील ज्या शहरांमध्ये माझे वास्तव्य असते तेथील मॉलमध्ये मी माझ्या मुलींसोबत जातो. ऑस्ट्रेलियामध्ये, कधीकधी मला टॉल पॉपी सिंड्रोम होतो. म्हणजे सकारात्मक मानसिकतेपूर्वी नेहमीच नकारात्मक मानसिकता निर्माण होते. पण भारतात आल्यावर सर्व काही सकारात्मक होते. इथले लोक प्रेमळ आहेत. ते जीवना प्रती नेहमीच सकारात्मक असतात. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते. ऑस्ट्रेलियात याची कमतरता भासते.'

'मी सुरक्षेशिवाय जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी चाहते मला वेड्यात काढतात. तू सुरक्षा का घेत नाहीस असे ते विचारता. चाहत्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे असतात. पण जर माझ्यासोबत माझ्या मुली असतीत तर ते समजुतदारपणे अंतर राखातात आणि आमची प्रयव्हसी जपतात. त्यांचा हा आदर पाहून मी थक्क होतो,' अशी भावनाही त्याने बोलून दाखवली. (David Warner)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT